Why Mobile Number Is Only 10 Digits? Find Out What Is The Reason Gk Marathi News


Reason For Being 10 Digit Mobile Number in India: आज मोबाईल ही काळाची गरज बनलं आहे. आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन (Mobile Number) असतोच. याद्वारे तुम्ही कॉल तर करूच शकता, शिवाय यातील अनेक फीचर्सच्या फायद्यानी तुम्ही अनेक कामे ही करू शकता. यातच तुम्हाला माहित असेलच की (10 Digit Mobile Number) भारतातील मोबाईल क्रमांक 10 अंकी आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतात? ते 11 किंवा 13 अंकी का असू शकत नाही. याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. 

भारतात 10 अंकी मोबाईल क्रमांक असण्याचे एक मुख्य कारण (Reason For Being 10 Digit Mobile Number in India) आहे, ज्यामुळे भारतातील मोबाइल क्रमांक (MNP) 10 अंकी आहेत. 2003 पर्यंत भारतात 9 अंकी मोबाईल क्रमांक असायचे, पण आता ही संख्या बदलून 10 झाली आहे.

Reason For Being 10 Digit Mobile Number in India : म्हणूनच  मोबाईल नंबर 10 अंकी आहे…

भारतातील मोबाइल क्रमांक 10 अंकी (10 Digit Mobile Number Which Country) असण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘नॅशनल नंबरिंग प्लॅन’ म्हणजेच NNP. जर मोबाईल नंबर एक अंकी असेल तर 0 ते 9 पर्यंत फक्त 10 वेगवेगळे नंबर बनवता येतील. 10 नंबर बनवल्यास त्याचा वापर फक्त 10 लोक करू शकतील. दुसरीकडे 2 अंकी मोबाईल क्रमांक असला तरी 0 ते 99 पर्यंतचे फक्त 100 नंबर बनवता येतील आणि ते फक्त 100 लोकच वापरू शकतील.

Reason For Being 10 Digit Mobile Number in India : लोकसंख्या ही आहे प्रमुख कारण

देशात 10 अंकी मोबाईल नंबर असण्यामागे लोकसंख्या हे देखील एक कारण आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटी (अंदाजित) आहे आणि अशा परिस्थितीत1 किंवा 2 अंकी मोबाईल क्रमांक मोजक्याच लोकांना उपलब्ध होईल. जर 9-अंकी मोबाईल नंबर असेल तर फक्त मर्यादेपर्यंत नंबर तयार करता येतील. तर गणनेनुसार 10 अंकी सुमारे 1000 कोटी वेगवेगळे मोबाईल नंबर बनवता येतात. त्यानंतर 135 कोटी लोकांना वेगवेगळे नंबर वितरित करणे सोपे होईल. याच कारणामुळे भारतात 10 अंकी मोबाईल नंबर आहेत.

News ReelsSource link

Leave a Comment