Whatsapp Users Can Edit Messages Soon Like Twitter Edit Button Marathi News


WhatsApp Edit Message Feature : लोकप्रिय चॅटिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच वेगवेगळे फिचर्स अपडेट करत असतात. नुकत्याच मिळालेल्या एका अहवालानुसार, आता WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फिचर यूजर्सना त्यांचे पाठवलेले संदेश (Message) एडिट (Edit) करण्यास परवानगी देतील अशा पद्धतीचे असणार आहे. ज्याप्रमाणे Twitter वर मेसेज एडिट केले जाऊ शकतात. त्याच पद्धतीचे हे नवीन फिचर असणार आहे. सध्या या फिचरवर काम सुरु आहे. हे फिचर कसे असेल ते जाणून घ्या. 

व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज एडिट करू शकाल

WABetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येत आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्सना त्यांचे पाठवलेले WhatsApp मेसेज देखील एडिट करता येणार आहेत. या फीचरची माहिती WABetaInfo ने स्क्रीनशॉटद्वारे शेअर केली आहे. या संदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे फिचर Twitter च्या Edit Button प्रमाणेच काम करेल.

हे फीचर याप्रमाणे काम करेल 

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp चे एडिट फीचर ट्विटरच्या (Twitter) एडिट बटणाप्रमाणे काम करेल. व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजरने एकदा मेसेज एडिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला पहिल्या मेसेजमध्ये काय लिहिले आहे ते दिसणार नाही, पण मेसेज एडिट झाला आहे हे त्यांना नक्की कळेल. 

या फीचरची सध्या चाचणी (टेस्टिंग) केली जात आहे आणि हे व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा अपडेट व्हर्जन 2.22.20.12 वर दिसले आहे. लवकरच iOS च्या बीटा व्हर्जनवरही हे फीचर पाहता येणार आहे. व्हॉट्सअॅप एडिट फीचर सर्व युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.  

महत्वाच्या बातम्या : 

5G Network : फोनमध्ये 5G सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी भारताकडून Apple आणि Samsung वर दबाव

Source link

Leave a Comment