<p>तुम्हाला व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी हवी असेल तर तुमचं फेसबुक अकाऊंटच डिलीट करा, हा पर्याय सुचवलाय फेसबुकच्या वकिलांनी. फेसबुकच्या वकिलांनी तसा युक्तिवादच सुप्रीम कोर्टात केला. व्हॉट्सअॅप यूजर्सचा काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो, पण व्हॉटसअॅपच्या वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर आपलं अकाऊंट न ठेवता व्हॉट्सअॅप वापरावं, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. फेसबुक-व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणावरून सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी फेसबुकच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला. </p>
<p> </p>
<p> </p>
Source link
