WhatsApp New Accidental Delete Feature Can Save You From Embarrassment Tech Marathi News


WhatsApp Accidental Delete Feature : Meta चे मेसेजिंग अॅप WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात. आपल्या यूजर्ससाठी कंपनी दररोज नवनवीन अपडेट देत असते. कंपनीने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO केले जाऊ शकतात. WhatsApp ने नवीन ‘Accidental delete ‘फीचर सादर केले आहे.

 

 

हे फीचर कसं काम करतं?
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्ती किंवा ग्रुपला मेसेज पाठवता आणि चुकून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ ऐवजी ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक करता. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने अॅक्सिडेंटल डिलीट फीचर आणले आहे. हे फीचर यूजर्सना चुकून डिलीट झालेल्या मेसेजला पाच सेकंदांची विंडो देऊन आणि ‘Delete for Me’ वरून ‘Delete for everyone’ वर क्लिक करून मदत करेल.

 

मेसेज UNDO करण्याची सुविधा
हे फीचर यूजर्सना डिलीट झालेला मेसेज UNDO करण्यासाठी काही सेकंद देते. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर Android आणि iPhone डिव्हाइसवरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

हे फीचर देखील लाँच
गेल्या महिन्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने भारतात एक नवीन ‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. हे फीचर तुम्हाला नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देते. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.

2017 मध्ये डिलीट फॉर एव्हरीवन पर्याय 

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, 2017 मध्ये, व्हॉट्सअॅपने “डिलीट फॉर एव्हरीवन” हा पर्याय सादर केला. वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काढून टाकण्यासाठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे. दरमायन, याची बीटा चाचणी ऑगस्टमध्ये काही Android आणि iOS यूजर्स साठी करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : शिरोळ, करवीर, कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Source link

Leave a Comment