WhatsApp Message Yourself Feature Launch What Is It How To Use


WhatsApp Message Yourself Feature: जगभरात मोठ्या प्रमाणात WhatsApp अॅपचा वापर केला जात आहे. आजच्या काळात कमीच लोक असतील जे व्हॉट्सअॅपचा वापर करत नसतील. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अपडेट घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरचं नाव आहे “मेसेज युवरसेल्फ”. याद्वारे तुम्ही नोट्स पाठवू शकता. तसेच कोणतेही कष्ट न घेता Reminder सेट करू शकता. या फीचरद्वारे यूजर्स अॅपमध्ये मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी ही सुविधा सुरू केली जाईल, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. अशातच जर तुम्हाला अद्याप हे फीचर तुमच्या WhatsApp मिळाले नसेल, तर तुम्हाला त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.

कसं वापरायचं हे फीचर?

  • WhatsApp वर Message Yourself हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी Google Play Store किंवा Apple App Store वरून तुमचे अॅप अपडेट करा.
  • अपडेट केल्यानंतर व्हॉट्स अॅप ओपन करा.
  • क्रिएट न्यू चॅटवर क्लिक करा.
  • येथे आपण संपर्कांमध्ये आपला स्वतःचा नंबर पाहू शकाल.
  • आता तुमचा नंबर निवडा आणि मेसेजिंग सुरू करा.

या फीचरद्वारे यूजर्स स्वतःसोबत नोट्स शेअर करू शकतात. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅपवरील इतर चॅटमधून कोणताही मेसेज किंवा मल्टीमीडिया फाइल फॉरवर्ड करू शकता. तुम्ही व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करू शकता आणि WhatsApp वर फोटो क्लिक करू शकता आणि ते स्वतःसाठी सेव्ह करू शकता. यासोबतच नोट-टेकिंग अॅप म्हणून WhatsApp वापरणाऱ्यांसाठी हे एक उत्तम फीचर आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप डेस्कटॉप आणि वेबवर देखील काम करत असल्याने युजर्स सर्व कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर हे फीचर वापरू शकतात. येत्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला व्हॉईस स्टेटस, वेबवर व्हॉईस कॉल आणि इतर सुविधा देखील देऊ शकतो.

इतर महत्वाची बातमी: 

News Reels

भारत, रशिया, अमेरिकेसह 84 देशांतील 50 कोटी Whatsapp युजर्सचा डेटा लीक; खासगी माहितीची ऑनलाईन विक्री



Source link

Leave a Comment