Whatsapp Is Down Users Across Several Countries Complain On Twitter Maharashtra Marathi News


Whatsapp Down : जगात संवादाचं सर्वात मोठं माध्यम असलेली व्हॉट्सअॅप सेवा आज कोलमडली आणि जगभरातल्या अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली. जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली. व्हॉट्सअॅपकडून कोणतंही अधिकृत माहिती मिळाली नाही, त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झाला आहे. ‘लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सेवा सुरू करू’, असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप डाऊननंतर अनेकजण त्रस्त आहेत. अनेक युजर्सचा खोळंबा झाला आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र मीम्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. 

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. 

Source link

Leave a Comment