What Is Full Form And Meaning Of Atm Know More Information Insight Marathi News


ATM Full Form : एटीएम (ATM) येण्यापूर्वी लोकांना बॅंकांमधून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागत होतं. मात्र, एटीएम मशीनच्या शोधामुळे या समस्येतून सगळ्यांचीच सुटका झाली. आता पैसे काढण्यासाठी बॅंकेत मोठी रांग लावावी लागत नाही. तर, जवळपासच्या कोणत्याही एटीएममध्ये जाऊन आपण पैसे अगदी सहज काढू शकतो. मात्र, रोजच्या वापरात वापरलं जाणारं हे एटीएम याचा फुल फॉर्म नेमका काय याबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर या ठिकाणी आम्ही एटीएमचा फुल फॉर्म याबद्दल माहिती सांगणार आहोत.  

ATM चा फुल फॉर्म काय?

खरंतर, ATM चा फुल फॉर्म काय? असा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. मात्र, अनेकजण यामध्ये गोंधळ करतात. ATM चा फुल फॉर्म अनेकजण Any time Money असाच अर्थ अनेकांना माहित आहे. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. खरंतर, ATM चा फुल फॉर्म Automated teller machine असा आहे. 

news reels

A – Automated

T – Teller

M – Machine

ATM म्हणजे काय? (What is ATM) :

ATM म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मशीन आहे ज्याचा उपयोग हा पैसे काढणे, पैसे पाठवणे अशा अनेक प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांमध्ये होतो. ATM च्या मशीन शहराच्या विविध भागांत, ठिकठिकाणी दिसतात.  ATM मशीन आल्यापासून बँकेचे व्यवहार हे अधिक सोपे आणि जलद झाले आहेत.

जगात ATM विविध नावांनी ओळखलं जातं

एटीएम हे जगाच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कॅनडामध्ये, एटीएमला ABM स्वयंचलित बँकिंग मशीन (Automatic Banking Machine) असेही म्हणतात. इतर देशांमध्ये, कॅश पॉइंट, कॅश मशीन, मिनी बँक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.  

ATM चा शोध कोणी लावला?

एटीएम मशीनचा शोध 1969 साली लागला. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावला होता. त्यांचा जन्म भारताच्या ईशान्य भागात असलेल्या शिलाँग शहरात झाला होता. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावलेल्या या शोधामुळे लोकांचा व्यवहार अधिक सोयीचा झाला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Cabinet Incentive Scheme: भीम अॅप आणि रुपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची मोठी योजना, 2600 कोटींची तरतूद



Source link

Leave a Comment