Vodafone Idea Network Down VI Network Down Netizen Raises Complanit On Internet What Is Going On


Vodafone Idea Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं (VI – Vodafone Idea) नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून व्होडाफोन आयडिया ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

व्हीआयचं नेटवर्क डाऊन

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी युजर्संना व्हीआयचं नेटवर्क वापरण्यात अडथळे येत आहे. काही यूजर्सना इंटरनेट वापरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत तक्रार केली आहे. ट्विटरवर अनेक व्हीआय युजर्सने तक्रार केली आहे की, त्यांना व्हीआय नेटवर्क चालत नाही. नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. व्हीआयचं नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांची कामं रखडली आहेत.  

युजर्सची सोशल मीडियावर तक्रार

 

 

 

 

 

 

Source link

Leave a Comment