Vodafone Idea Closed REDEX Plan Free Plan Of Netflix Hotstar Closed


मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडीयाने (Vodafone Idea) त्याच्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांचा सर्वात लोकप्रिय असलेला REDEX प्लॅन बंद केला आहे. कंपनीच्या REDEX प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार सारख्या प्रमुख OTT प्लॅटफॉर्मची सुविधा मिळायची. आता हा प्लॅन बंद करण्यात आल्याने यूजर्समध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. 

व्होडाफोन आयडीयाने त्यांच्या यूजर्सला सर्वाधिक फायदेशीर असलेल्या REDEX हा पोस्टपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनचा फायदा हा जुन्या यूजर्सना मोठ्या प्रमाणात होत होता. आता त्यांच्याही अॅप किंवा वेबसाईटवर हा प्लॅन दिसत नसल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे. 

व्होडाफोन आयडीयाच्या REDEX या पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टारच्या फ्री सबस्क्रिप्शनसोबत अनेक फायदे मिळत होते. कंपनीचा हा प्लॅन 1099, 1699 आणि 2299 या किमतीला सबस्क्राईब करता येऊ शकत होता. यामध्ये फ्री कॉलिंग आणि डेली एसएमएस तसेच अनेक चांगल्या ऑफर्स देण्यात येत होत्या. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्टवर लाऊंजचे अॅक्सेसही मिळायचं. मात्र कंपनीने हा प्लॅन का बंद केला यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

व्होडाफोन आयडीयाचा 151 रुपयांत मनोरंजनाचा जबरदस्त धमाका

टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियानं त्याच्या यूजर्ससाठी प्रीपेड प्लॅनमध्ये एक खास ऑफर ठेवली आहे. कंपनीने त्याच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 8 जीबी डेटा देणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग आणि फ्री एसएमएस यासारख्या सुविधा मिळणार नाहीत. 

तुम्हाला अधिक डेटासह डिज्नी प्लस हॉटस्टार  मोफत पाहिजे असेल तर 399 रुपयांच्या रिचार्जचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 28 दिवसांची वैधता देते. त्यात दररोज 20.5 जीबी डेटा तुम्हाला मिळेल. कंपनी प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना तीन महिन्यांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार  मोबाईलवर मोफत देत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. 

499 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडीयाच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये  डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलच्या मोफत सबस्क्रिप्शनची ऑफर कंपनी देत आहे. यामुळे एका वर्षासाठी  डिस्ने प्लस हॉटस्टार मोफत मिळते. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.Source link

Leave a Comment