Vivo X90 Series Smartphones More Expensive Than IPhone 13, Know The Price And Features


Vivo X90 Series : Vivo ने आपली Vivo X90 सीरीज जागतिक बाजारात लॉन्च केली आहे. Vivo X90, Vivo X90+ आणि Vivo X90 Pro या सीरीजअंतर्गत लॉन्च केली आहे. यापैकी Vivo X90 Plus हा केवळ चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर इतर दोन मॉडेल्स इतर बाजारपेठांमध्येही सादर केले जातील. Vivo X90 आणि Vivo X90+ मध्ये MediaTek Dimensity 9200, AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

Vivo X90, Vivo X90 Pro किंमत 

Vivo X90 आणि Vivo X90 Pro दोन्ही एकाच 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. Vivo X90 ची किंमत MYR 3,699 (अंदाजे 70,000 रुपये) आहे. तर X90 Pro ची किंमत MYR 4,999 (अंदाजे 95,000 रुपये) आहे. रंग पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, Vivo X90 मॉडेल ब्रीझ ब्लू आणि एस्टेरॉइड ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर केले गेले आहे. तर प्रो मॉडेल सिंगल लीजेंड ब्लॅक व्हेगन लेदर पर्यायामध्ये लॉन्च केले गेले आहे.

Vivo X90 स्पेसिफिकेशन 

Vivo X90 मध्ये 6.67-इंच वक्र फुल एचडी + Q9 अल्ट्रा-व्हिजन AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,800×1,260 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9200 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह येतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP64 रेटिंग आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेटअपमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 4,810 mAh बॅटरी आणि 120W ड्युअल सेल फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे.

Vivo X90 Pro  स्पेसिफिकेशन 

Vivo X90 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2,800×1,260 पिक्सेल रिझोल्यूशन, FHD + Q9 अल्ट्रा-व्हिजन AMOLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 9200 चिपसेट आहे. फोनला 12GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. हँडसेटमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo X90 Pro मध्ये 4,890 mAh बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट आहे.

दोन्ही फोन iPhone 13 पेक्षाही आहे महाग 

Vivo X90 सीरीजचे दोन्ही नवीन फोन Apple च्या iPhone 13 पेक्षा महाग आहेत. iPhone 13 ची किंमत 69900 रुपये आहे. जर तुम्ही आयफोन 13 खरेदी केला तर ऑफर आणि सवलतींनंतर तुम्हाला तो सुमारे 61000 रुपयांना मिळेल.

 Source link

Leave a Comment