Vivo V27 Series Launched In India With 120Hz Curved Display See Price Specifications Tech News In Marathi


Vivo V27 Series Launched : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आज आपली Vivo V27 सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने 2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यात Vivo V27 आणि Vivo V27 Pro चा समावेश आहेत. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 66 वॉट फास्ट चार्जिंगसह 4600 mAh बॅटरी मिळेल. MediaTek Dimensity 7200 आणि 8200 प्रोसेसर असलेले मोबाईल फोन लॉन्च करण्यात आले आहेत.

Vivo V27 Series Launched: किती आहे किंमत?

Vivo V27 कंपनीने दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. याच्या 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे कंपनीने 3 स्टोरेज पर्यायांमध्ये Vivo V27 Pro लॉन्च केला आहे. याच्या 8/128GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये, 8/256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12/256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. नोबेल ब्लॅक आणि मॅजिक ब्लू रंगांमध्ये तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकाल. कंपनी या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 3,000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट आणि 2,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डवर ही सूट दिली जात आहे.

कंपनीने Vivo V27 आणि Vivo V27 Pro साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. तुम्ही फ्लिपकार्ट किंवा विवोच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टफोन बुक करू शकता. Vivo V27 Pro ची विक्री 6 मार्चपासून सुरू होणार आहे. Vivo V27 ची विक्री 23 मार्चपासून सुरू होईल.

Vivo V27 Series Launched:  स्पेसिफिकेशन 

Vivo V27 Pro ला 6.7-इंचाचा हाय रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरवर काम करेल. तसेच Vivo V27 मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर मिळेल. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर Vivo V27 pro मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा असेल. त्याचप्रमाणे, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 50-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

Vivo V27 Series Launched: फीचर्स 

Vivo च्या या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना वेडिंग स्टाइल पोर्ट्रेट कॅमेरा फिल्टर्स मिळतील. यासोबतच नाईट फोटोग्राफीसाठी ऑरा लाईट सपोर्ट उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्ही फ्लॅशलाइटच्या मदतीने रात्रीही उत्तम फोटो काढू शकाल.

Realme ने लॉन्च केला फास्ट चार्जिंग स्मार्टफोन

Realme ने Realme GT 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनची बॅटरी फक्त 4 मिनिटांत 50% चार्ज होते आणि स्मार्टफोन सुमारे 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. सध्या हा मोबाईल फोन ग्लोबल स्तरावर लॉन्च झाला आहे, जो लवकरच भारतातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.Source link

Leave a Comment