Viral News Wife Driving E-rickshaw After Husband’s Death Praised By Anand Mahindra


Viral News: काही लोकांसाठी जीवन हे खूप कठीण असतं. अपयश आणि जीवनातील समस्यांना तोंड देत अनेक लोक खचून जातात. तर काही धाडसी लोक या कठीण परिस्थितीशी दोन हात करून त्याला सामोरे जातात. अशा धाडसी लोकांची आश्चर्यकारक कामगिरी सोशल मीडियावर (Social Media) अनेक नेटकऱ्यांना प्रेरित (Life Motivation) करताना दिसते. अशाच आता एका ई-रिक्षा चालवणाऱ्या महिलेची गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परमजीत कौर (Paramjit Kaur) असे या महिलेचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी मोठ्या धैर्याने संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा (E-Rickshaws) चालवण्यास सुरुवात केली आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पंजाबमधील (Punjab) रहिवासी परमजीत कौर यांच्या या धाडसी पाऊलाचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकत परमजीत कौर यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या ई-रिक्षा (E-Rickshaws) चालवताना दिसत आहे. फोटो पोस्ट करताना त्यांनी परमजीतची गोष्ट जगासोबत शेअर केली आहे.

News Reels

सोशल मीडियावर या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केले जात आहे. बहुतेक नेटकरी या पोस्टकडे प्रेरणा म्हणून पाहत आहेत आणि जीवनातील अडचणींसमोर पराभव न स्वीकारता कठोरपणे त्याला सामोरे जायला हवं, असं अनेक नेटकरी म्हणत आहेत. अनेक यूजर्स परमजी यांच्या धैर्याला सलाम करताना दिसत आहेत.

दरम्यान, आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या ट्वीट अकाऊंटवरून वेगवेगळ्या लोकांची गोष्ट आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी एका तरुणाने बनवलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा व्हिडीओ शेअर करत त्याच कौतुक केलं होत. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे. याची किंमत फक्त 12,000 रुपये आहे. तसेच ही बाईक 8 ते 10 रुपये खर्च करून पूर्णपणे चार्ज होते आणि एका चार्जमध्ये 150 किमी धावू शकते.   

इतर महत्वाच्या बातम्या: 

Anand Mahindra: किंमत फक्त 12 हजार, एका चार्जमध्ये गाठते 150km; आनंद महिंद्रांना आवडली ‘ही’ बाईक

 





Source link

Leave a Comment