UPI Payment Not Working On New Year Eve UPI Transaction Issue All Bank


UPI Transaction Issue: नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही मिनिट राहिले आहे. अनेक लोक सिलेब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. अशातच लोकांची मूड खराब करणारी बातमी समोर आली आहे.युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI अॅप देशभरात डाऊन झाले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. UPI डाउन झाल्यानंतर अनेक यूजर्सने ट्विटरवर तक्रारी करायला सुरुवात केली आहे. युपीआय डाऊन झाल्याने अनेक लोक वैतागली आहेत. यामध्ये अनेक नेटकरी ट्विटवर ट्वीट करून आपला राग व्यक्त करत आहेत.   

सिलेब्रेशनच्या मूडमध्ये असलेल्या अनेक लोकांना युपीआय डाऊन झाल्याने लोकांना पेटीएम, फोन पे आणि गुगल पेवरुन पेमेंट कर्तनही अडचणी येत आहेत. लोक ट्विटवर ट्वीट करून याबाबत माहिती देत आहेत.  

 

UPI ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. भारतातील 60 टक्क्यांहून अधिक किरकोळ व्यवहार या सेवेवर अवलंबून आहेत. या सेवेच्या मदतीने अगदी लहान पेमेंट देखील झटपट करता येतात. सध्या UPI द्वारे बहुतेक व्यवहार हे कमी मूल्याची आहेत. देशातील 75 टक्के UPI पेमेंटमध्ये 100 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांचा समावेश आहे.





Source link

Leave a Comment