Up News Police Reply On Elon Musk Tweet Now Post Went Viral


Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती, टेस्ला (Tesla) आणि आता ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मस्क काही ना काही ट्विट करत असतात. या ट्विटवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत असतात. त्यावर मस्कही पुन्ही रिट्विट करतात. मस्क यांचे अनेक ट्विट यांमुळे चर्चेत असतात. सध्या मस्क यांचं एक ट्विट आणि त्यावरील युपी पोलिसांचं ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. युपी पोलिसांनी एलॉन मस्क यांच्या ट्विटला भन्नाट
 उत्तर दिलं आहे. हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

युपी पोलिसांचं एलॉन मस्क यांना भन्नाट उत्तर

एलॉन मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये एलॉन मस्क यांनी लिहिलं होतं की, ‘मी ट्विट केल्यावर माझ्या ट्विटची गिनती माझ्या कामामध्ये केली जाते का?’ या ट्विटवर युपी पोलिसांनी त्यांच्या अंदाजात केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. मस्क यांच्या ट्विटवर युपी पोलिसांनी ट्विट करत म्हटलं की, ‘जर युपी पोलिसांनी तुमची तक्रा ट्विटवर सोडवली, तर हे काम मानलं जाईल का?’ यानंतर युपी पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या ट्विटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यावर ‘होय, हे काम मानलं जाईल.’, असंही लिहिलं आहे. त्यामुळे युपी पोलिसांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

News Reels

ट्विटरवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही ना काही ट्विट करत असतात. असंच एक ट्विट मस्क यांनी केलं होतं. यामध्ये त्यांनी विचारलं की, ‘मी ट्विट केल्यावर ते माझं काम समजलं जातं का?’ या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 





Source link

Leave a Comment