UIDAI Launched Aadhaar Mitra AI Tool It Is Better Than Chatgpt Learn How To Use It


Aadhaar Mitra AI tool: ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित टूल्स किंवा सेवा एकामागून एक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केल्या जात आहेत, त्यावरून हे वर्ष AI चे असणार आहे, असं दिसत आहे. यातच आता आधार कार्डशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने AI/ML आधारित चॅटबॉट ‘आधार मित्र’ त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह केलं आहे. या चॅटबॉटद्वारे तुम्ही आधारशी संबंधित समस्यांची उत्तरे जाणून घेऊ शकता. पूर्वीप्रमाणे तुम्हाला वेबसाइटवर जास्त मेहनत करण्याची गरज नाही. हा चॅटबॉट तुमच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल. नेमकं हे कसं काम करतं? याचा वापर तुम्ही कसं करू शकता, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…

या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लगेच मिळतील

या AI/ML आधारित चॅटबॉट म्हणजेच ‘आधार मित्र’ सह तुम्ही आधार कार्डशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या जसे की, आधार पीव्हीसी स्थिती, आधार अपडेट स्थिती, तक्रारीचा मागोवा घेणे किंवा नवीन तक्रार नोंदवणे इत्यादी प्रश्नाची माहिती त्वरित मिळू शकतात. UIDAI ने हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. जेणेकरून लोकांना चांगला अनुभव मिळावा आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती कोणत्याही अडचणीशिवाय वेळेवर मिळू शकेल. UIDI ने यासंदर्भात एक ट्विटही केले आहे. जर तुम्हाला हे नवीन AI टूल वापरायचे असेल तर तुम्ही फोटोमध्ये दाखवलेला QR कोड स्कॅन करून हे काम करू शकता.

नेमकं हे कसं काम करतं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही देखील आधार मित्र एआयला वैयक्तिकरित्या हा प्रश्न विचारला की, पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय, त्यानंतर या चॅटबॉटने त्याचे उत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला.  याचं उत्तर देण्याचा स्पीड पाहून हा चॅटबॉट चॅट जीपीटीपेक्षा चांगला असं दिसून येतं. असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे, चॅट जीपीटी तुम्हाला व्हिडीओ दाखवत नाही. हे फक्त टेक्समध्ये उत्तर देते, तर आधार मित्र व्हिडीओ देखील दाखवत आहे, जेणेकरून लोकांना गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतील.

असं करू शकता वापर… 

सर्वातआधी uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. होम पेजवर तुम्हाला तळाशी उजवीकडे ‘आधार मित्र’ बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला चॅटबॉटला जो प्रश्न विचारायचा आहे तो सर्च बॉक्समध्ये लिहा. तुम्ही एंटर दाबताच चॅटबॉट तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.

Source link

Leave a Comment