Twitter New Policy Marathi News Elon Musk Announcement Negative And Hate Tweets 


Twitter New Policy : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्कने (Elon Musk) नकारात्मक आणि द्वेषपूर्ण ट्विट संदर्भात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. मस्क यांनी ट्विट करत सांगितले की, की अशाप्रकारचे ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून ट्विटरकडून नवीन धोरणाची (New Twitter Policy) घोषणा करण्यात आली आहे. मस्कने स्पष्ट केले की, आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अजिबात विरोधात नाही, मात्र आता ट्विटरवर नकारात्मक आणि भडकाऊ ट्विट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

 

 

ट्विट करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, परंतु…

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘ट्विटरच्या नवीन धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु अशा प्रकारच्या ट्विटचे स्वातंत्र्य नाही. नकारात्मक/द्वेषपूर्ण ट्विट जास्तीत जास्त डीबूस्ट केले जातील आणि डिमोनेटाईझ केली जाईल. अशा ट्विट्सना Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे साधन उपलब्ध असणार नाही. 

 

प्रतिबंधित खाती पुन्हा सुरू केली

तत्पूर्वी, मस्कने असेही जाहीर केले की, ट्विटरने यापूर्वी बंदी किंवा निलंबित केलेले अनेक वादग्रस्त अकाऊंट पुन्हा रिस्टोअर  करण्याची योजना करत आहे, दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर अद्याप निर्णय घेणे बाकी आहे. एलॉन मस्क यांनी या मायक्रोब्लॉगिंग साइटचा ताबा घेतल्यापासून ट्विटरचे नियम दिवसेंदिवस बदलत आहे. मस्कने आता ट्विटरवर बंदी घातलेली खाती रिस्टोअर करण्याचे कामही सुरू केले आहे. त्यांनी अलीकडेच अमेरिकन कॉमेडियन कॅथी ग्रिफिन आणि प्रोफेसर जॉर्डन पीटरसन यांची खाती रिस्टोअर केली आहेत. बॅबिलॉन बी या व्यंगचित्राच्या वेबसाइटचे खातेही रिस्टोअर करण्यात आले आहे. मस्कने स्वतः ट्विट करून याची माहिती दिली होती. मात्र, आतापर्यंत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा भारतीय अभिनेत्री कंगना रणौत यांचे खाते रिस्टोअर झालेले नाही.

शेकडो कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरची अनेक कार्यालये बंद 
ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. राजीनाम्यानंतर कंपनीने अनेक कार्यालये काही दिवस बंद ठेवली होती. त्यामुळे कार्यालयात गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर ही परिस्थिती पाहून मस्क आणि त्यांच्या सल्लागारांनी काही कामगारांची बैठक घेऊन त्यांचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मस्कने कंपनीतील 7,500 पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचार्‍यांपैकी निम्म्या कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना असल्याची माहिती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या

Twitter : ‘काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचाय हे ठरवा’; एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम





Source link

Leave a Comment