Twitter New Feature Coming Soon In January 2022 Marathi News


Twitter : एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून त्यात बरेच बदल झाले आहेत. गेल्या वर्षी ट्विटरमध्ये युजर्ससाठी अनेक मोठे बदल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षातही ट्विटर लवकरच अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटरकडे मायक्रोब्लॉगिंग साईट म्हणून पाहिलं जातं. पण, एकदा त्याची टेक्स्ट कॅरेक्टर लिमिट वाढली की ती मायक्रोब्लॉगिंग साईटच्या रेंजमधून काढून टाकली जाईल. एलॉन मस्क यांनी ही घोषणा केली  होती. 

दरम्यान, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, लवकरच ट्विटरवर काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये साईड स्वीप फीचरच्या माध्यमातून यूजर्स ट्विट, ट्रेंड्स, टॉपिक, लिस्ट इत्यादी नेव्हिगेट करू शकतील. अॅपवर किती दिवसांपर्यंत अपडेट्स येतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र यावर्षी ट्विटरमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

मस्क यांनी ट्विट केले आहे

एलॉन मस्क यांनी 31 डिसेंबर रोजी ट्विट केले की ट्विटर नेव्हिगेशन जानेवारीमध्ये सुरू होईल, जे यूजर्सना शिफारस केलेले, फॉलो केलेले ट्विट, ट्रेंड आणि विषय इत्यादींमध्ये स्वीप आणि स्विच करण्यास परवानगी देईल.

‘हा’ सर्वात मोठा बदल असेल

जेव्हापासून एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतलं आहे, तेव्हापासून या प्लॅटफॉर्मवर एक मोठा बदल होत आहे. आता ट्विटरच्या UI इंटरफेसमध्येही बदल होणार असल्याचे मानले जात आहे. म्हणजेच ट्विटरच्या कलरमध्ये किंवा डिझाइनमध्ये काही बदल होऊ शकतात. मात्र, हे किती दिवस होणार याची माहिती समोर नाही. पण या वर्षी ट्विटरच्या डिझाईनमध्येही बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे. यासोबतच ट्विटर लाइक, रिट्विट, कोट ट्विट इत्यादी बदलण्याचे काम करत आहे.

ट्वीटचा View Count 

काही वेळापूर्वी, ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करून सांगितले होते की, लवकरच ट्विटरवर ‘View Account For Tweet’ फीचर काही दिवसांतच आणले जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Sim Card : मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या Sim Card चा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचा

Source link

Leave a Comment