Twitter Layoffs 10 Precent Of Employees Fired By Elon Musk In Fresh Round Of Job Cut


Twitter Layoff: प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून येथील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यातच कंपनीने पुन्हा एकदा शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) आपल्या वृत्तात म्हटले आहे की, शनिवारी (25 फेब्रुवारी) रात्री झालेल्या या कर्मचारी कपातात प्रॉडक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट आणि इंजिनिअर प्रभावित झाले आहेत. हे कर्मचारी मशीन लर्निंग आणि साइट विश्वसनीयता यासारख्या गोष्टींवर काम करत आहेत. त्यांच्या मदतीने ट्विटरची अनेक फीचर्स ऑनलाइन ठेवण्यास मदत होते.

Twitter Layoff: नोव्हेंबरमध्ये 3,700 कर्मचाऱ्यांची करण्यात आली होती कपात 

जानेवारी 2023 मध्ये इलॉन मस्क (elon musk) यांच्या ट्विटनुसार, कंपनीमध्ये सुमारे 2,300 कर्मचारी कार्यरत आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने मोठ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. खर्चात कपातीचे कारण देत कंपनीने सुमारे 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नोव्हेंबरमध्ये मस्क (elon musk) यांनी सांगितले होते की, कंटेंट मॉडरेशन दरम्यान जाहिरातदारांनी जाहिरात देणे कमी केलं असल्याने कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

2023 मध्ये दररोज 2732 लोकांच्या नोकऱ्या गेल्या

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता, वाढती महागाई आणि जागतिक आव्हाने यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम कंपन्या आणि नोकऱ्यांवर होत आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे कंपन्यांना कमीत कमी पैसा खर्च करायचा आहे आणि अशा परिस्थितीत ते मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहेत. यासोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी भरती करण्यासही टाळाटाळ करत आहेत. Trueup.io डेटानुसार, 2023 मध्ये एकूण 534 टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. त्यामुळे यावर्षी एकूण 1.53 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. यामध्ये दररोज एकूण 2,732 लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. दुसरीकडे जर आपण वर्ष 2022 बद्दल बोललो तर, एकूण 2.41 लाख टेक कामगारांना म्हणजे दररोज 1,535 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.

इतर बातमी: 

Marathi: अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष आहेत? त्याने काय फायदा होतो? आतापर्यंत कोणत्या भाषांना हा दर्जा मिळालाय? जाणून घ्या सर्वकाही 

   Source link

Leave a Comment