Twitter Blue To Relaunch Today Twitter Blue Launch On 12 December Blue Tick Edit Tweet Feature


Twitter Blue Subscription : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आजपासून पुन्हा एकदा ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा (Twitter Blue Subscription) सुरु करणार आहे. आज Twitter Blue रिलाँच करण्यात येणार आहे. यासोबतच ट्विटर एडिट फिचर (Tweet Edit Button) आणि इतर अनेक फिचर लाँच करण्याची शक्यता आहे. ट्विटर एडिट बटण (Tweet Edit Feature) लाँच करणार आहे. यामुळे आता तुम्हांला तुमचं ट्विट एडिट करता येणार आहे. यासोबतच ट्विटर इतरही अनेक बदल करणार असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. 

ब्लू टिक सबस्क्रिप्शन आजपासून सुरु होणार

ट्विटर कंपनीने सांगितलं आहे की, ट्विटर सोमवारी 12 डिसेंबरला ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु करणार आहे. या सेवेसाठी दरमहा आठ डॉलर (सुमारे 659 रुपये) शुल्क आकारण्यात येईल. दरम्यान अँड्रॉईड (Android) युजर्सच्या तुलनेत आयफोन युजर्ससाठी (iOS User) ब्लू टिक सेवा महाग असणार आहे. आयफोन (iPhone) युजर्ससाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 11 डॉलर (सुमारे 907 रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे.

News Reels

नाव बदलल्यावर ब्लू टिक ‘गायब’

ट्विटर युजर्सने त्यांच्या प्रोफाईलवरील नाव किंवा फोटो बदलल्यास त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. मात्र, पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा युजरला ब्लू टिक मिळेल. यासोबतच ट्विटरने वाढती स्पर्धा पाहता आणखी काही फिचर जोडण्याची संकल्पा आखली आहे. यानुसार, आता तुम्हांला इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे ट्विटरवरही कंटेंट शेअर करता येणार आहे. यानुसार, तुम्ही ट्विटवर 1080p पर्यंतचे व्हिडिओ देखील अपलोड करू शकाल.

ब्लू, ग्रे आणि गोल्डन टिकचा पर्याय

ट्विटरने घोषणा केली होती की, ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्विटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा (Grey) ऑफिशियल टॅग (Official Tag) देण्यात येईल. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी ट्विटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक (Golden Tick) देण्यात येईल. ब्लू टिक युजरने नाव, प्रोफाईल फोटो, किंवा माहिती बदलल्यावर ब्लू टिक गायब होईल. त्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन केल्यावर ब्लू टिक परत मिळेल. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा आठ डॉलर शुल्क आकारण्यात येईल.

 





Source link

Leave a Comment