<p>ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलन मस्क यांनी एकापाठोपाठ धक्कादायक निर्णय घेतलेत. यापैकीच एक निर्णय होता ट्विटरच्या ब्लू टिकसाठी महिना 8 डॉलर्स शुल्क आकारण्याचा. पण या निर्णयावरूनही संभ्रम निर्माण झालाय. हा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ट्विटरवर फेक अकाऊंट्सची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे ब्लू टिकसाठी 8 डॉलर्स आकारण्याचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पण याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला नसल्यानं संभ्रम वाढलाय.</p>
Source link
