Twitter Accounts Verified With Gold Grey Blue Colour Ticks Know What Does It Mean Marathi News


Twitter Verified Accounts Features : ट्विटरचा (Twitter) बहुप्रतिक्षित “अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम” (Twitter Account Verification Program) अखेर लॉंच करण्यात आला आहे. आतापर्यंत सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्सना निळ्या रंगाची टिक दिली जात होती, परंतु आता त्यापैकी अनेकांना सोनेरी टिक्स देण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी नवीन व्हेरिफिकेशन प्रोग्राम सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. 

आता 3 रंगांमध्ये व्हेरिफाय होणार ट्विटर अकाउंट्स 

एलॉन मस्क म्हणाले, कंपन्यांसाठी ‘गोल्डन टिक’, तर सरकारी संस्थांसाठी ‘ग्रे टिक’ मिळेल. त्याचबरोबर वैयक्तिक श्रेणीसाठी पूर्वीप्रमाणेच ‘ब्लू टिक’ दिली जाईल. नवीन ऑटोमॅटिक सिस्टीम तयार होईपर्यंत ही सर्व अकाऊंट्स सध्या मॅन्युअली व्हेरिफाईड केली जातील 

पेड वेरिफिकेशनबाबत सध्या कोणताही निर्णय नाही

News Reels

द व्हर्जच्या वृत्तानुसार, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ‘ट्विटर ब्लू’ सबस्क्रिप्शन आधीच सुरू करण्यात आले आहे. याआधी, मस्कने 7.99 USD म्हणजेच 1600 रुपये दरमहा भरून त्यांचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करण्यासाठी एक स्कीमही सुरू केली होती.

अनेकांकडून स्कीमचा गैरवापर

याचा फायदा घेत अनेकांनी बड्या कंपन्या आणि प्रसिद्ध लोकांच्या नावाने बनावट खाती तयार करून त्यांचे व्हेरिफिकेशन (Twitter Account Verification) करण्यात आले. या बनावट ट्विटनंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स गगनाला भिडले, त्यानंतर अनेक जाहिरातदार कंपन्यांनी ट्विटरवर जाहिराती देणे बंद केले होते.

‘एडिट’ बटणचा समावेश

Twitter Blue च्या वैशिष्ट्यांमध्ये एडिट बटणचा समावेश आहे. अनेक ट्विटर यूजर्सची एडिट पर्याय उपलब्ध करून देण्याची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. यात काही वापरकर्त्यांचं म्हणणं आहे की, मोठ्या प्रमाणात शेअर केल्यानंतर ट्वीट बदलल्यास चुकीची माहिती पसरण्याची शक्यता वाढेल. ट्विटरचे म्हणणे आहे की, ब्लू-टिक सदस्यांना कमी जाहिराती दिसतील. त्यांचे ट्वीट इतरांपेक्षा वेगळे असतील. तसेच ते हाय क्वालिटी व्हिडीओ पोस्ट करू शकतील आणि पाहू शकतील. 

‘वेदनादायी’ पण ‘आवश्यक’ निर्णय – एलॉन मस्क

यानंतर एलॉन मस्क यांनी पैसे देऊन ट्विटर अकाउंट व्हेरिफिकेशन करून घेण्याची स्कीम थांबवली होती. आता मस्कने म्हटलंय की, जोपर्यंत यूजर स्व:तहून हे बनावट खाते असल्याचे स्पष्टपणे जाहीर करत नाही, तोपर्यंत त्यांचे ट्विटर खाते ब्लॉक केले जाईल.  मस्क यांनी नवीन अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम ‘वेदनादायक’ परंतु कंपनीच्या हितासाठी ‘आवश्यक’ असल्याचे म्हटले आहे. ही यंत्रणा कशी काम करेल, याचा प्रदीर्घ अहवाल पुढील आठवड्यात प्रसिद्ध केला जाईल, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Twitter Gold Tick: ट्विटरने लॉन्च केली ‘गोल्ड टिक’, फक्त यांनाच मिळणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती



Source link

Leave a Comment