Transparent Smartphone Will Launch Soon Know Details And Features Tech Marathi News


Transparent Smartphone : आतापर्यंत आपण फोल्डेबल आणि रोलेबल डिस्प्लेसह स्मार्टफोनच्या डिझाइन्स (Smartphones) पाहिल्या आहेत. Samsung, Oppo, Vivo, Xiaomi, Motorola यासह अनेक कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अशातच, यावर्षी नथिंग (Nothing) कंपनीने पारदर्शक (Transparent) बॅक पॅनलसह स्मार्टफोन लाँच केला आहे, हा एक युनिक स्मार्टफोन म्हटला जातोय. असे स्मार्टफोन भविष्यातही येऊ शकतात, ज्याच्या माध्यमातून आपण सर्व आर-पार पाहू शकतो. अशाप्रकारे भविष्यातील स्मार्टफोनचा कॉन्सेप्ट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

सर्व हार्डवेअर पारदर्शक असतील!
पारदर्शक बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या व्हिडीओमध्ये फोनच्या बॅटरीसह हार्डवेअरचे भाग दिसणार नाहीत. या स्मार्टफोनची बॉडी काचेसारखी पारदर्शक आहे, ज्यातून एखाद्या आरश्याप्रमाणे पाहता येते. या स्मार्टफोनच्या व्हिडीओला लोकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.

कोणता स्मार्टफोन ब्रँड बनवणार?

एका रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग फीचरला सपोर्ट करेल. यामध्ये पारदर्शक वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनच्या कॉन्सेप्ट व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की, हा एक अँड्रॉइड फोन आहे, ज्यामध्ये गुगल प्ले स्टोअरचा आयकॉन दिसू शकतो. तसेच, नोटिफिकेशन पॅनेल देखील दिसणार आहे. मात्र, हा भविष्यातील फोन कोणता स्मार्टफोन ब्रँड बनवणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Reels

अनेक व्हिडिओ झाले व्हायरल 
तुम्हाला अशाप्रकारचे अनेक पारदर्शक स्मार्टफोन्सचे कन्सेप्ट व्हिडीओ YouTube वर पाहायला मिळतील, गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन निर्मात्यांनी ज्या प्रकारे डिस्प्ले अपग्रेड केले आहेत. येत्या काही वर्षांत आपण अशाप्रकारे स्मार्टफोन्स पाहू शकतो. LG आणि Samsung या सर्वात मोठ्या डिस्प्ले उत्पादन कंपन्यांमध्ये जागतिक स्तरावर ओळखल्या जातात. याशिवाय इतर अनेक कंपन्या या प्रकारची स्क्रीन आणू शकतात, जी पूर्णपणे पारदर्शक असेल.

ट्रांसपेरेंट टेक्नोलॉजीवर काम सुरू
अशा अनेक पारदर्शक स्मार्टफोनच्या संकल्पना तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. अशाप्रकारे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या काही वर्षांत ते अपग्रेड करतील. एलजी आणि सॅमसंग सारख्या जागतिक स्तरावर डिस्प्ले बनवणार्‍या कंपन्या अशा प्रकारचे मोबाईल लॉन्च करणार्‍या पहिल्या कंपनी असू शकतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Tech Layoffs : दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा नोकरकपात; यामागचं नेमकं कारण काय?

 

 

 

 

 Source link

Leave a Comment