Sana Ali Daughter Of Bus Driver Appointed Assistant Tech Engineer At ISRO


Sana Ali Selected in ISRO : मेहनत आणि जिद्द या जोरावर तुम्ही कोणतंही ध्येय साध्य करु शकता, हे एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने करुन दाखवलं आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका बस ड्रायव्हरच्या (Bus Driver) मुलीने ‘अवकाश भरारी’ मारली आहे. मध्य प्रदेशातील सना अली हिची इस्त्रो (ISRO) म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) मध्ये निवड झाली आहे. सना अली हिची इस्रोमध्ये (ISRO) तांत्रिक सहाय्यक म्हणजेच टेक्निकल असिस्टेंट इंजिनिअर (Technical Assistant)  पदावर निवड झाली आहे. 

बस ड्रायव्हरच्या मुलीची ISRO मध्ये निवड

अथक परिश्रमानंतर सनाचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सना अली टेक्निकल असिस्टेंट इंजिनिअर (Technical Assistant) म्हणून इस्रोमध्ये (ISRO) रुजू होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनीही यानिमित्ताने सना अली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. जिथे इच्छा तिथे मार्ग ही म्हण सना अलीने खरी करुन दाखवली आहे. 

सना अली मध्य प्रदेशची रहिवासी

सना अली ही मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) रहिवासी आहे. मध्य प्रदेशातील विदिशा (Vidhisha) निकसा मोहल्ला या भागात सना तिच्या कुटुंबासोबत राहते. तिचे वडील साजिद अली (Sajid Ali) एक बस ड्रायव्हर आहेत. साजिद अली यांचे कुटुंब एका पडक्या घरात वास्तव्यास आहे. साजिद अली यांची मुलगी सना अली लहानपणापासून अभ्यासात फार हुशार आहे. 

लहान मुलांचे ट्यूशन घेऊन भरली फी 

आर्थिक अडचणींमुळे सना अलीने प्रसंगी लहान मुलांचे ट्यूशन घेऊन स्वत:च्या शिक्षणासाठी फी भरली. तिने हे यश मिळवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. सनाला अंतराळ आणि त्यातील रहस्यांमध्ये सुरुवातीपासूनच खूप आवड होती. यामुळे सनाचे इस्रोमध्ये (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) जाण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.

news reels Reels

सना अलीची सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये निवड

सनाचे इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न काही सोपे नव्हते. यामध्ये सर्वात मोठा अडथळा होता आर्थिक चणचण. आई-वडिलांनी सनाला शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वडिलांनी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेऊन सनाच्या शिक्षणासाठी खर्च केला. तिच्या आईने तिचे मौल्यवान दागिने गहाण ठेवले. 

सनाने एसएटी कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. सना अलीची सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये तांत्रिक सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सना अली आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी ‘पृथ्वी’, आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?



Source link

Leave a Comment