Samsung Galaxy S23 Series Launch Effect Galaxy S22 Gets Massive Price Cut In India


Samsung Galaxy S22 Price Drop: कोरियन कंपनी सॅमसंगने (Samsung) 1 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च केली आहे. ही सीरीज लॉन्च केल्यानंतर कंपनी आपल्या Samsung Galaxy S22 सीरीजची किंमत सतत कमी करत आहे. दरम्यान, कंपनीने तिसऱ्यांदा Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. यापूर्वी जेव्हा कंपनीने Samsung Galaxy S22 ची किंमत कमी केली होती, तेव्हा तो 57,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होता. आता कंपनीने पुन्हा 5,000 रुपयांची कपात केली आहे आणि आता याची किंमत  53,999 रुपये इतकी झाली आहे.

Samsung Galaxy S22 Price Drop: मिळणार 2,000 अधिक सूट 

एवढेच नाही तर कंपनी ग्राहकांना काही ऑफर्सही देत ​​आहे. तुम्ही सॅमसंग शॉप अॅपद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल. यासह कंपनी OneDrive मध्ये 100GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज देत आहे.

Samsung Galaxy S22 Price Drop: स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy S22 बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1-इंचाचा FHD Plus डिस्प्ले मिळेल. जो 120 hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8व्या जनरेशन 1 चिपसेटवर काम करतो. Samsung Galaxy S22 दोन स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 8/256GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो.

Samsung Galaxy S22 Price Drop: कॅमेरा 

Samsung Galaxy S22 बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1-इंचाचा FHD Plus डिस्प्ले मिळेल. जो 120 hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8व्या जनरेशन 1 चिपसेटवर काम करतो. Samsung Galaxy S22 दोन स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 8/256GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो.

Realme नवीन Coca-Cola स्मार्टफोन लॉन्च करणार 

दरम्यान, Realme 10 फेब्रुवारी रोजी Realme 10 Pro 5G फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन आधीच लॉन्च केला आहे, परंतु Coca-Cola सोबत Collaboration केल्यानंतर कंपनी 10 फेब्रुवारीला पुन्हा नवीन एडिशनमध्ये लॉन्च करेल. सध्या कंपनीने या फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे, जी तुम्ही Realme  च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतःसाठी बुक करू शकता. या फोनची बुकिंग पूर्णपणे मोफत आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंपनीने दिलेले काही फायदे देखील मिळतील.

हेही वाचा: 

Vivo X90 Series चे स्मार्टफोन iPhone 13 पेक्षाही महाग, जाणून घ्या किंमत आणि फीचर्सSource link

Leave a Comment