Republic Day 2023 Stickers Know How To Download 26th January Whatsapp Stickers Send To Loving One Marathi News


Republic Day 2023 Stickers : भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) उद्या साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सगळीकडे जंगी तयारी आपल्याला पाहायला मिळतेय. दिल्लीच्या राजपथापासून ते गल्लीबोळा प्रत्येक ठिकाणी या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, सध्याच्या या डिजिटल युगात आपण बहुतांश गोष्टी मोबाईलच्या मदतीने करतो. दरम्यान विविध सणांना एकमेंकाना शुभेच्छा देण्यासाठी देखील WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात अलीकडे WhatsApp वर आलेल्या स्टीकर्स या पर्यायामुळे शुभेच्छा देताना आणखी गंमत वाटते. अशात आपला 74 वा प्रजासत्ताक दिन एका दिवसावर आला असताना अनेकांना हे WhatsApp स्टीकर्स नेमके कुठून मिळवायचे हे माहित नसतं. तर याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

देशाच्या 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) साजरा करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. आतापासूनच सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रजासत्ताक दिनाच्या विविध पोस्ट सोशल मीडियावर फिरत असून अनेक शासकीय इमारतींना रोषणाई देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष सेलिब्रेशन साजरा करता येत नव्हतं. मात्र, आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. दरम्यान WhatsApp वर एकमेंकाना स्टीकर पाठवण्यासाठी काही सोप्या स्टेप्स तुम्ही करु शकता. यासाठी तुम्हाला काही अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करावी लागणार आहेत. 

WhatsAppच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day stickers) स्टीकर्स कसे डाऊनलोड आणि शेअर कराल?

  • तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल तर, गुगल प्ले स्टोअरवर किंवा आयफोनच्या अॅप स्टोरवर जाऊन Republic Day Stickers for WhatsApp असं टाईप करा.
  • तुम्हाला इथं अनेक पर्याय दिसून येथील ज्यामधील तुम्हाला आवडेल ते स्टीकर अॅप तुम्ही सिलेक्ट करून डाऊनलोड करु शकता.
  • स्टीकरसाठीचं अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन केल्यावर तुमच्यासमोर अनेक स्टीकर्सचे पर्याय दिसतील. या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार स्टीकरसमोरील ‘+’ आयकॉन दाबत तुम्ही स्टीकर निवडू शकता.
  • स्टीकर अॅड केल्यानंतर ते स्टीकर्स व्हॉट्सअपमध्ये मेसेज सेंड करताना येणाऱ्या किबोर्डजवळील स्माईली (Smiley) आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. 
  • हे स्टीकर्स दिसल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये मेसेजप्रमाणे सेंड करु शकता अशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

news reels New Reels

Republic Day 2023 : Amazon सेलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त बंपर ऑफर; अनेक वस्तूंवर मिळतेय तब्बल 60% सूट



Source link

Leave a Comment