Relief For Railway Passengers Increased Distance For Ticket Booking Through UTS App


UTS App Distance : रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना ( Railway Passengers ) दिलासा दिला आहे. यूटीएसमध्ये ( UTS ) मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. उपनगरीय  ( Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा दोन किलोमीटरवरुन पाच किलोमीटर करण्यात आली आहे. तर गैर-उपनगरीय ( Non-Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा पाच किलोमीटर यांच्यावरुन 20 किलोमीटर करण्यात आली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

UTS ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीचं अंतर वाढवलं

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात. रेल्वेच्या तिकीट घराच्या खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट बुक करणं पसंत करतात. यासाठी यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपचा वापर केला जातो. मात्र, या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट बुक करताना प्रवाशांना अडथळे येत होते. दरम्यान आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने युटीएस ॲपमधील अंतराचे निर्बंध शिथिल करत अंतराची मर्यादा वाढवली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.

आता पाच किमीपर्यंत अंतरापर्यंतचं तिकीट करा बुक

Reels

अलिकडे कोरोनानंतर युटीएस ॲप पूर्णपणे सुरु करण्यात आला आहे. कोरोनाकाळात लोकल सेवा बंद होती. त्यासोबतच युटीएस ॲपही बंद होतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेने हे ॲप सुरु केलं. युटीएस ॲपमध्ये तिकीट बुक करण्यासाठी काही बंधनं आहेत. यानुसार, ठराविक अंतरावरूनच तुम्ही रेल्वे तिकीट बुक करु शकता. पण या निर्बंधांमुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अनेक अडचणी येत होत्या.

उपनगरीय लोकलचं तिकीट काढण्यासाठी दोन किमीची मर्यादा होती. तर गैर-उपनगरीय लोकलचं तिकीट काढण्यासाठी पाच किमीची मर्यादा होती. केवळ पण आता रेल्वेने या निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्याने लाखो रेल्वे प्रवाशांनी दिलासा मिळाला आहे.

तिकीटांमधून मध्य रेल्वेची 193 कोटींची कमाई 

मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर या सात महिन्यात तिकीट तपासणीतून 193.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे सात तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी प्रत्येकी 90 लाखांपेक्षा जास्त वसूली केली आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते.  विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.Source link

Leave a Comment