Reliance Jio 5G Service In Mumbai Jio Free 5g Service In Four Cities From Tomorrow Marathi News


Reliance Jio 5G Service In Mumbai : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. रिलायन्स जिओ उद्यापासून चार शहरांमध्ये 5G सेवेची चाचपणी (टेस्टिंग) करणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांचा समावेश आहे. ही बीटा सेवा जगातील सर्वात प्रगत 5G सेवा असेल असा कंपनीने दावा केला आहे. या सेवेमार्फत Jio ग्राहकांना सिम न बदलता मोफत 5G सेवा दिली जाईल आणि त्यांना फास्ट इंटरनेट सेवा मिळेल असे सांगण्यात आले आहे. 

 

यूजर्ससाठी Jio True 5G वेलकम ऑफर

1. Jio True 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू केली जाईल. 
2. या 5G सेवेच्या अंतर्गत, ग्राहकांना 1 Gbps + च्या वेगाने अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.
3. संबंधित शहरांत 5G पायाभूत सुविधा तयार होताच इतर शहरांमध्येही ही सेवा उपलब्ध होईल.
4. यूजर्सना बीटा चाचणी अंतर्गत मोफत 5G सेवा मिळेल, जोपर्यंत त्या शहरात कव्हरेज आणि यूजर्स अनुभव सुधारला जात नाही. 
5. जिओ वेलकम ऑफर अंतर्गत, कोणत्याही ग्राहकाला जिओ सिम किंवा हँडसेट बदलण्याची गरज नाही, त्यांना आपोआप 5G सेवा मिळेल.
6. Jio 5G हँडसेटसाठी स्मार्टफोन कंपन्यांबरोबर काम करत आहे, जेणेकरून यूजर्सना डिव्हाइसद्वारे चांगला अनुभव मिळू शकेल.  

ही एक बीटा सेवा आहे

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एक बीटा चाचणी आहे. बीटा चाचणी हा पूर्ण लॉन्च होण्यापूर्वीचा चाचणी टप्पा आहे. ज्यामध्ये ग्राहकांचा अभिप्राय घेतला जातो. मग येणाऱ्या फीडबॅकच्या आधारे त्यामध्ये काही गोष्टी बदलल्या जातात. जिओचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या 425 दशलक्ष यूजर्सना 5G सेवेचा नवीन अनुभव देऊ इच्छित आहे. या माध्यमातून भारताला डिजिटल युगात परिवर्तित करायचे आहे. 

अधिकृतपणे जिओकडून दिवाळीत 5जी सेवा सुरु

रिलायन्स जिओकडून चाचपणी (टेस्टिंग) तत्त्वावर जरी ही 5G सेवा सुरु करण्यात येणार असली तरी मात्र, अधिकृतपणे जिओकडून दिवाळीत 5जी सेवा सुरु होणार आहे. यामध्ये कोणता नेटपॅक भरता येईल, त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? या गोष्टींची स्पष्टता येत्या काही दिवसांतच कळेल.   

महत्वाच्या बातम्या : 

Source link

Leave a Comment