Redmi Launched A 300W Powerful Charger Mobile Will Be 100 Percent Charged In Just 5 Minutes


Redmi 300 Watt Fast Charger: या वर्षीचा सर्वात मोठा मोबाईल शो बार्सिलोनामध्ये सुरू आहे. हा शो 2 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये विविध मोबाईल कंपन्या त्यांचे नवीन तंत्रज्ञान, गॅजेट्स इत्यादी सादर करणार आहेत. नवीन फोन विकत घेताना लोक मोबाईलच्या स्पेसिफिकेशनकडे जितके जास्त लक्ष देतात, तितकेच ते त्याच्या चार्जरकडे लक्ष देतात. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या वॅट्सचे फास्ट चार्जर देते. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी ऐकले असेल किंवा वाचले असेल की Realme आपल्या नवीन फोन Realme GT3 मध्ये 240W फास्ट चार्जर देणार आहे, जो जगातील सर्वात वेगवान चार्जर असेल. मात्र आता Redmi ने Realme ला मागे टाकून 300-वॅटचा फास्ट चार्जर सादर केला आहे. मोबाइल शोच्या दुसऱ्या दिवशी Redmi ने हा 300 वॅटचा चार्जर सादर केला आहे, जो केवळ 5 मिनिटांत मोबाइल फोनला पूर्ण चार्ज करतो. Redmi चा हा 300-वॉट फास्ट चार्जर Redmi Note 12 Pro Plus 5 मिनिटांत चार्ज करतो. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

एक प्रसिद्ध टिपस्टर ‘डिजिटल चॅट स्टेशन’ ने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पो चार्जर फक्त 43 सेकंदात फोन 1 ते 10% चार्ज करत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे फोन 2 मिनिटे 13 सेकंदात 1 ते 50% पर्यंत चार्ज होतो. हा व्हिडीओ भारतीय टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. अभिषेक यादव नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित बातम्या किंवा मोबाईल फोनच्या अपडेट्स शेअर करत असतो. सध्या Redmi ने या 300W चार्जर बद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. 300W चा चार्जर बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम करेल की नाही? हे सांगणे देखील कठीण आहे.

Redmi 300 Watt Fast Charger: Realme GT 3 मध्ये मिळणार 240 वॅटचा चार्जर 

Realme ने आपल्या Realme GT 3 स्मार्टफोनमध्ये 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन फक्त 9.5 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. Redmi ने नवीन चार्जरची घोषणा करेपर्यंत Realme GT 3 चर्चेत होता. मात्र आता सोशल मीडियावर Redmi च्या चार्जरची मोठी चर्चा आहे.  

इतर बातमी: 

Nokia New Logo: नोकियाने 60 वर्षात पहिल्यांदाच बदलला लोगो, कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या

 

Source link

Leave a Comment