Realme 5G Smartphone Is Available Cheaply In Flipkart Electronic Sale You Can Save So Much Money


Flipkart : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ‘Flipkart Electronics Sale 2023’ सुरू आहे. हा सेल 24 जानेवारीपासून सुरू झाला आहे, जो 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेल अंतर्गत तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटसारख्या अनेक गोष्टी सवलतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. Flipkart वर काही Realme स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जात आहे. येथे आम्ही तुम्हाला काही ऑफर्सबद्दल सांगत आहोत.

Realme च्या स्मार्टफोन्सवर मिळत आहे जबरदस्त ऑफर्स 

Realme 9 5G

Flipkart वर, Realme 9 5G चे 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असलेले व्हेरिएंट 15,499 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय मोबाईल फोनवर 14,850 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळाला तर तुम्ही हा स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. Realme 9 5G 6.5 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो, जो MediaTek Dimensity 810 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल.

Realme 10 pro 5G

6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह Realme 10 Pro 5G च्या व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय मोबाईल फोनवर 17,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. Realme 10 Pro 5G मध्ये तुम्हाला 6.2-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरवर काम करतो आणि तुम्हाला यात 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

Realmee gt neo 3T

Realme GT neo 3T चे 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 31,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. तुम्हाला या स्मार्टफोनवर Flipkart Axis Bank कार्डवर 25,500 रुपयांची अॅक्सचेंज ऑफर आणि 5% कॅशबॅक दिला जात आहे. Real Me GT neo 3T मध्ये तुम्हाला 6.62 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर SoC वर काम करतो. एकूणच, Realme च्या स्मार्टफोनवर सध्या Flipkart वर चांगली डील ऑफर केली जात आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुम्ही नवीन फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.Source link

Leave a Comment