Realme 10 Pro Coca-Cola Edition Sale Starts Take Home This Phone For Just 739 Lets Find Out How


Realme 10 Pro Coca-Cola Edition: Coca-Cola च्या नवीन स्मार्टफोनची म्हणजेच Realme 10 Pro Coca Cola Edition ची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तुम्ही ‘रिअलमी’च्या अधिकृत वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये बरेच अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच याचा कॅमेराही जबरदस्त आहे. या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 739 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता, कसं हे जाणून घेऊ…

Realme 10 Pro 5G Coca Cola एडिशन कंपनीने 10 फेब्रुवारी रोजी बाजारात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनवर तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक दिला जात आहे. जर तुम्ही पूर्ण पैसे देऊन हा स्मार्टफोन एकाच वेळी खरेदी करू शकत नसाल, तर तुम्ही तो EMI अंतर्गत घरी आणू शकता. मोबाईल फोनचा EMI दरमहा 739 रुपयांपासून सुरू होतो.

Realme 10 Pro Coca-Cola Edition: मिळणार हे फीचर्स 

Realme 10 Pro 5G Coca Cola Edition मध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. मोबाईल फोन 6.72 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो, जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 10 Pro 5G Coca Cola Edition Snapdragon 695 5G SoC वर काम करते. कॅमेराच्या बाबतीत हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 11 5G सेल देखील सुरू 

आजपासून तुम्ही OnePlus 11 5G देखील खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीसह येतो. जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यासोबतच तुम्हाला Snapdragon 8th Generation 2 SoC चा सपोर्ट मिळतो. मोबाईल फोनची किंमत 56,999 रुपयांपासून सुरू होते, जी 61,999 रुपयांपर्यंत जाते. कंपनी तुम्हाला स्मार्टफोनवर बँक ऑफर्सचा लाभही देत ​​आहे.

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G 2023 Turbo

Infinix ने अलीकडेच आपले दोन नवीन फोन Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo बाजारात लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन 6.7 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतात, जे 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimension 920 SoC चा सपोर्ट मिळत आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Zero 5G 2023 ची किंमत 17,999 रुपये आहे. तर Infinix Zero 5G 2023 Turbo Edition ची किंमत 19,999 रुपये आहे.Source link

Leave a Comment