Polygraph Test Lie Detector Machine How Polygraph Test Works Accuracy Limitations Advantage Disadvantage Polygraph Marathi News


Lie Detector Machine : आपण नेहमीच बातम्यांमध्ये ऐकतो की एखाद्या आरोपीकडून सत्य माहिती घ्यायची असेल तर त्याची लाय डिटेक्टरी चाचणी करा अशी मागणी केली जाते. अनेक चित्रपटांमध्येही तेच दाखवलं जातंय. म्हणजेच लाय डिटेक्टरी मशिन किंवा पॉलिग्राफी मशिनच्या (Polygraph) माध्यमातून एखाद्याच्या मनातील सर्व माहिती काढून घेता येते. एखादी व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे बोलत आहे हे शोधण्यासाठी तपास एजन्सी आणि इतर संस्थांद्वारे बऱ्याच काळापासून याचा वापर केला जात आहे. नुकत्याच गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताबची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली होती. पॉलीग्राफ मशीन एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक प्रतिक्रियांमध्ये बदलाची नोंद करते. त्यावरून ती व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे बोलत आहे हे दिसून येते. हे मशीन कसे काम करते ते सविस्तर जाणून घेऊया.

How Polygraph Test Works: पॉलीग्राफ मशीन कसे काम करते?

पॉलीग्राफ मशिनमध्ये अनेक घटक असतात, ज्यांचं मोजमाप एखाद्या व्यक्तीचा मानसिक प्रतिसाद शोधण्यासाठी केला जातो. यामध्ये काय समाविष्ट आहे ते जाणून घेऊया.

न्युमोग्राफ: हा घटक व्यक्तीच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीची नोंद करतो आणि श्वसन क्रियेतील बदल ओळखतो.

कार्डियोवास्कुलर रिकॉर्डर (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रेकॉर्डर): हा घटक एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची गती आणि रक्तदाब नोंदवतो.

गॅल्व्हॅनोमीटर: हा घटक त्वचेची विद्युत चालकता मोजतो, ज्यामुळे घामाच्या संबंधित ग्रंथीमध्ये होणारे बदल लक्षात येतात.

रेकॉर्डिंग डिव्हाइस: हा घटक पॉलीग्राफ मशीनच्या इतर घटकांद्वारे गोळा केलेला डेटा रेकॉर्ड करतो.

जेव्हा एखादी व्यक्ती पॉलीग्राफ मशीनशी जोडली जाते, तेव्हा परीक्षक त्या व्यक्तीला अनेक प्रश्न विचारतात. मशीन त्या व्यक्तीची शारीरिक प्रतिक्रिया नोंदवते. प्रश्न सहसा फक्त होय किंवा नाही या स्वरुपात विचारले जातात. परीक्षक सुरुवातीला सामान्य प्रश्न देखील विचारतात, जे केसशी संबंधित नाहीत. हे मशीनची चाचणी घेण्यासाठी आणि रेकॉर्डिंग पाहण्यासाठी केलं जातं. ती व्यक्ती खरं बोलतेय की नाही हे तपासण्यासाठी हे सामान्य प्रश्न विचारले जातात.

पॉलीग्राफ चाचण्या नेहमी अचूक असतात का?

पॉलीग्राफ चाचणी नेहमीच अचूक असते असं नाही. कधीकधी एखादी व्यक्ती खरं बोलत असते, पण ती खोटं बोलत असल्याचं हे मशिन सांगतं.
या चाचणी दरम्यान जेव्हा एखादी व्यक्ती घाबरली असेल किंवा ती चिंताग्रस्त असते तेव्हा हे असं होऊ शकतं. त्याचपद्धतीने एखादी व्यक्ती जर खोटं बोलत असेल ती खरं बोलतेय अशी नोंदही हे मशिन घेऊ शकतं. जर एखादी व्यक्ती त्यांच्या शारीरिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल किंवा यंत्राला फसवण्यासाठी काही प्रतिकारक उपाय वापरत असेल तर असे होऊ शकते.

म्हणजेच एखादा मुरब्बी गुन्हेगार या मशिनलाही फसवू शकतो आणि अलगद गुन्ह्यातून मुक्त होऊ शकतो. Source link

Leave a Comment