Poco X5 Series Launched In India Check Price Specifications Other Details


Poco X5 Series Launched: चीनी स्मार्टफोन निर्माता Poco ने आज जागतिक स्तरावर आपले 2 नवीन स्मार्टफोन Poco X5 5G आणि Poco X5 Pro 5G लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 778G चा सपोर्ट मिळेल. किती आहे या दोन्ही मोबाईल फोनची किंमत आणि यात कोणते फीचर्स मिळणार हे जाणून घेऊ…

Poco X5 Series Launched: किती आहे किंमत? 

Poco X5 5G दोन स्टोरेज पर्याय 6/28GB आणि 8/256GB मध्ये सादर करण्यात आला आहे. तुम्ही कंपनीचे बेस मॉडेल 199 डॉलर्स (16,459 रुपये) आणि टॉप एंड व्हेरिएंट 249 डॉलर्समध्ये (20,594 रुपये) खरेदी करू शकता. Poco X5pro बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने याला 2 स्टोरेज पर्यायांमध्ये देखील सादर केलं आहे. पहिला 6/128GB आणि दुसरा 8/256GB आहे.

Poco च्या 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. कंपनी तुम्हाला ICICI बँक कार्डवर Poco X5pro मध्ये 2,000 रुपयांची सूट देत आहे. त्यानंतर दोन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 20,999 आणि 22,999 होईल. Poco X5pro 5G ची विक्री भारतात 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Poco X5 Series Launched: Poco X5 5G : स्पेसिफिकेशन

Poco X5 5G मध्ये, तुम्हाला 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करेल. Poco X5 5G मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्टफोन 68 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल. Poco X5 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असेल.

Poco X5 Series Launched: Poco X5 pro 5G : स्पेसिफिकेशन

Poco X5 pro 5G मध्ये, तुम्हाला 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाइल फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिसेल. ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा असेल. समोर, तुम्हाला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करेल. Poco X5 pro 5G मध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.Source link

Leave a Comment