POCO C55 Launched With New Game Changer At Starting Price Of Rs 8499 Tech News Marathi


Poco C55 Launched: Poco ने आज आपला नवीन फोन ‘Poco C55’ बाजारात लॉन्च केला आहे. अलीकडेच कंपनीने आपला फ्लॅगशिप फोन Poco x5pro देखील बाजारात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत जवळपास 30,000 रुपये असली तरी आज लॉन्च झालेला फोन कंपनीने अगदी कमी किंमतीत लॉन्च केला आहे. ज्यांना स्वस्तात Android चा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी Poco C55 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळणार आहेत. कोणते आहेत हे फीचर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Poco C55 Launched: किंमत 

कंपनीने 2 स्टोरेज पर्याय 4/64GB आणि 6/128GB मध्ये Poco C55 सादर केला आहे. Poco च्या 4/64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तर 6/128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनी ग्राहकांना या फोनवर1,000 रुपयांची सूट देत आहे. यानंतर फोनची किंमत अनुक्रमे 8,499 रुपये आणि 9,999 रुपये होईल. ग्राहकांना 500 रुपयांची सवलत आणि विविध बँकांच्या कार्डांवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे.

Poco C55 Launched: ‘या’ दिवसापासून फोन खरेदी करता येईल

28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टद्वारे Poco C55 स्मार्टफोन खरेदी करू शकाल. Poco C55 मध्ये ग्राहकांना 6.7-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो. तुम्हाला मोबाईल फोनच्या मागील बाजूस लेदर फिनिश मिळेल. Poco C55 मध्ये MediaTek Helio g985 प्रोसेसर सपोर्ट आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला मोबाईल फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Poco C55 मध्ये ग्राहकांना 5000 mAh बॅटरी मिळते, जी 10 W चार्जिंगला सपोर्ट करते.

Oneplus 11R ची बुकिंग सुरु 

दरम्यान, OnePlus 11R ची प्री-बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. OnePlus 11R दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे आणि 16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 44,999 रुपये आहे. फोनसाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि 28 फेब्रुवारीपासून डिव्हाइस खरेदीसाठी उपलब्ध होईल. फोन सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

स्मार्टफोनचा जास्त वापर करताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा होऊ शकतो NomophobiaSource link

Leave a Comment