Pathan Is The First Film In The Country To Release On ICE Format Know What It Means


Pathan Movie Release Date: तुम्हाला जर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुम्ही कधी ना कधी सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहिला असेलच. आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म (ott platform) ट्रेंडिंग आहे. मात्र असे असूनही अनेकांना सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहणे आवडते आणि त्याची एक वेगळीच मजा आहे. यातच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. कारण शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरांतील थिएटर्सचे बुकिंग आधीच केले आहे आणि अनेक ठिकाणी तिकिटांचे हार घालून व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

शारूखचे अनेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, आता याच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक आहेत. यातच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पठाण’ हा भारतातील पहिलाच चित्रपट आहे जो ‘इमर्सिव्ह सिनेमा एक्सपिरियन्स’ म्हणजेच ICE फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तुम्हाला हा चित्रपट IMAX आणि इतर फॉरमॅटमध्येही पाहता येणार आहे. आज या बातमीद्वारे जाणून घेऊ की, ICE फॉरमॅट म्हणजे नक्की आहे तरी कायआणि त्यात काय खास आहे. यातच देशात अशी फक्त 2 चित्रपटगृहे आहेत जिथे ICE फॉरमॅट स्पोर्ट आहे. म्हणजेच, तुम्ही फक्त 2 थिएटरमध्ये या फॉरमॅटचा आनंद घेऊ शकता.

ICE फॉरमॅट काय आहे?

इमर्सिव्ह सिनेमा एक्सपिरियन्स हे आतापर्यंतच्या सर्वोत्तम दृश्य अनुभवाचे स्वरूप असल्याचे म्हटले जाते. ICE फॉरमॅटमध्ये समोरच्या स्क्रीन व्यतिरिक्त तुम्हाला ऑडिटोरियमच्या बाजूला फलक मिळतात, ज्यामुळे तुमचे लक्ष चित्रपटातून हटत नाही आणि तुम्ही फोकस करून चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. या फॉरमॅटमध्ये चित्राच्या दृश्यानुसार रंग आणि प्रकाशाचा प्रभाव बदलतो. म्हणजेच साइड स्क्रीनवरही त्याचा प्रभाव तुम्हाला दिसेल. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात अशी फक्त दोनच ICE फॉरमॅट थिएटर आहेत. पहिला गुरुग्राम आणि दुसरा वसंत कुंज, दिल्ली येथे आहे.

IMAX फॉरमॅट काय आहे?

तुम्हाला देशातील अनेक शहरांमध्ये IMAX फॉरमॅट थिएटर सापडतील. या फॉरमॅटमध्ये, तुम्हाला हाय-रिझोल्यूशन कॅमेरे, फिल्म फॉरमॅट, प्रोजेक्टर आणि थिएटर व्ह्यूजचा आनंद लुटता येईल.  या फॉरमॅटमध्ये तुम्हाला 1.43:1 किंवा 1.90:1 च्या आस्पेक्ट रेशोमध्ये चित्रपट पाहता येईल. खुर्ची खास IMAX फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आली आहे, जेणेकरून दर्शक आनंद घेऊ शकतील.

news reels New Reels

हेही वाचा : 

आकर्षक डिझाईन आणि दमदार लूकसह Kia Carnival Facelift झाली स्पॉट; लवकरच भारतात होणार लॉन्चSource link

Leave a Comment