ज्ञानेश्वरांचे पसायदान | Pasaydan in Marathi Lyrics With Meaning, ( PDF + MP3)

Pasaydan in Marathi – पसायदान ही मराठीतील एक भक्ति  प्रार्थना आहे,. हे सामान्यतः उपासनेच्या रूपात किंवा भक्तीची अभिव्यक्ती म्हणून पाठ केले जाते किंवा गायले जाते.पसायदान ही संत ज्ञानेश्वर आणि लिहिली आहे,

 

पसायदान म्हणजे काय ?

 Pasaydan in Marathi

 

पसायदान” हा शब्द संस्कृत शब्द “पासा” म्हणजे बंधन किंवा जोड आणि “आयदान” म्हणजे मुक्ती किंवा सुटका या शब्दांपासून बनला आहे. म्हणून, “पसायदान” या शब्दाचा अर्थ सांसारिक आसक्तींपासून मुक्तीची विनंती आणि आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी प्रार्थना असा केला जाऊ शकतो.

भक्ताची आध्यात्मिक ज्ञानाची तळमळ, ईश्वराचे आशीर्वाद शोधणे आणि दैवी कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. ही एक भक्ती अभिव्यक्ती आहे जी शरणागती, नम्रता आणि परमात्म्याला भक्ती यावर जोर देते.

Pasaydan in Marathi – पसायदान हे सहसा धार्मिक मेळावे, मंदिरे आणि घरांमध्ये धार्मिक उत्सव किंवा विशेष प्रसंगी केले जाते. हे परमात्म्याशी जोडण्याचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळविण्याचे साधन आहे.

 

Pasaydan in Marathi Lyrics | ज्ञानेश्वरांचे पसायदान

 

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,

तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,

भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,

जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||

वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,

अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,

बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,

ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,

भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,

दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,

येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||

 

Pasaydan Lyrics in English | Pasaydan in Marathi

 

Ata wishchaatmake dewe, yene waag yajnje toshaawe

Toshuni maj dyaawe, pasaayadaan he..

 

Je khalaanchi wynkati saando.., taya satkarmi rati waadho

Bhuta paraspare jado, maitr jiwaanche.

 

Duritaache timir jaawo, wishw swadharmasurye paaho

Jo je waanchhil to te laaho praanijaath

 

Warshat sakalamngali, ishwaranishthhaanchi maandiyaali

Anawarat bhumandali, bhetatu bhutaan

 

Chala kalpatarunche arav, chetanaachintaamaninche gaanw

Bolate je arnav, piyushaache…

 

Chandrame je alaanchhan.., maartand je taapahin

Te sarwaanhi sada sajjan, soyare hotu

 

Kinbahuna sarwasukhi, purna.. houni tihinloki..

Bhaji jo adipurukhi, akhandith..

 

Ani grnthopajiwiye, wisheshi loki iye

Drishtaadrishtawijaye, ho awe ji ye.

 

Yeth mhane shriwishwesharaawo, ha hoil daanapasaawo

Yene ware jnyanjaanadewo sukhiya jhaala..

 

Pasaydan Lyrics In Marathi With Meaning | पसायदानाचा अर्थ

 

आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।

अर्थ – श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वांग्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान मागितले .(Pasaydan in Marathi)

 

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।

अर्थ – या पसायदानात ते मागतात कि जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .

 

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

अर्थ – वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.

 

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

अर्थ – सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे .

 

चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

अर्थ – त्या संतांच वर्णन ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत .

 

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

अर्थ – ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत व ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .

 

 

किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।

भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

अर्थ – या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .

 

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।

दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

अर्थ – आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे .

 

तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।

येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

अर्थ – त्यावर विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला , व ज्ञानेश्वर आनंदी झाले .

 

पसायदान – Pasaydan Lyrics – Lata Mangeshkar | Pasaydan in Marathi

 

 

Pasaydan song download mp3 , m4a

FAQ

 

पसायदान कधी म्हणावे?

Pasaydan in Marathi – सकाळी स्नानादिकानंतर अथवा संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास म्हणल्यास उत्तम. या वेळांत म्हणले की मन प्रसन्न होते. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटीसुद्धा म्हटले जाते.

 

पसायदान कोणी लिहिले ?

पसायदान संत ज्ञानेश्वरा नी लिहिले

 

ज्ञानेश्वरी कधी लिहिली गेली?

इ.स. 1290 , नेवासामध्ये ज्ञानेश्वरी  लिहिली गेली.

 

संत ज्ञानेश्वर यांचे गुरू कोण होते ?

श्री संत निवृत्तिनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर यांचे गुरू होते

 

पसायदान ही कविता कोणत्या ग्रंथात लिहिले आहे ?

संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

 

पसायदान मराठी pdf

पसायदान मराठी pdf

तर आ पनाला समजले असेल की पसायदान म्हणजे काय ते , Pasaydan in Marathi | पसायदानाचे महत्व काय ते,

Leave a Comment