Pan Card Online Update Process How To Do Pan Card Correction Marathi News


PAN Card Update Online: आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये जेवढं महत्त्व आधार कार्डाला प्राप्त झालं आहे. तेवढंच महत्त्वं आता पॅन कार्डाला (Permanent Account Number) प्राप्त झालं आहे. पॅन कार्ड आता अनिवार्य कागदपत्रं बनलं आहे. आयकर रिटर्न भरणं असो किंवा बँकेतील मोठे व्यवहार असोत, आता प्रत्येक कामांमध्ये पॅनकार्ड (PAN) अनिवार्य असतंच. ओळखपत्र म्हणूनही पॅनकार्डचा वापर करता येतो. जर तुम्ही नवीन पॅनकार्ड बनवलं असेल किंवा तुमच्याकडे आधीच पॅनकार्ड असेल, पण त्यात काही चूक असेल. किंवा तुम्हाला त्यात काही बदल करायचे असतील तर काळजी करण्याची गरज नाही.

यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याचीही गरज नाही. तासन्तास रांगे उभं राहण्याचीही गरज नाही. कारण, घरी बसून तुम्ही तुमचे पॅनकार्ड अगदी सहज आणि काही मिनिटांतच अपडेट करू शकता. तुम्हाला तुमच्या पॅनकार्डमधील नाव, फोटो, जन्मतारीख, पत्ता, लिंग, संपर्क क्रमांक किंवा इतर माहिती बदलायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला पॅनकार्ड ऑनलाईन अपडेट करण्याच्या सोप्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…

ऑनलाईन पॅनकार्ड अपडेट करायचंय? खालील स्टेप्स फॉलो करा : 

 • पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी, सर्वात आधी NSDL ई-गव्हर्नन्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • आता येथून सर्विस सेक्शनवर क्लिक करा.
 • सर्विस सेक्शन मधून, पॅनकार्ड ऑप्शनवर जा आणि चेंज/करेक्शन पॅन डेटावर क्लिक करा.
 • येथून आता तुम्हाला अॅप्लिकेशन टाइप ड्रॉप डाऊन मेन्यूवर जावं लागेल. आता सध्याच्या पॅन डेटामधील चेंज/करेक्शन किंवा रिप्रिंट PAN वर क्लिक करा.
 • आता तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यूमधून पॅनकार्ड प्रकार निवडावा लागेल आणि नंतर काही आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.
 • त्यात नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाईल नंबर भरावा लागेल. यानंतर फॉर्मसह कॅप्चा टाका आणि फॉर्म सबमिट करा.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर्ड होईल आणि तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर टोकन नंबर आणि लिंक मिळेल.
 • या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट पॅन अपडेट पेजवर याल. 
 • आता येथे मागितलेली आवश्यक माहिती भरा आणि नंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा. 
 • यानंतर, विनंती केलेली कागदपत्रं अपलोड केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट करावं लागेल.
 • पेमेंटसाठी, तुम्हाला डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग आणि क्रेडिट/डेबिट कार्डसारखे पर्याय मिळतात, तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पैसे भरू शकता.
 • पेमेंट कन्फर्म झाल्यावर, तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल.
 • ही एक्नॉलेजमेंट स्लिप प्रिंट करून घ्या आणि NSDL ई-गव्हर्नन्सच्या दिलेल्या पत्त्यावर फोटो आणि स्वाक्षरी इत्यादी माहितीसह पाठवा.
 • यानंतर संबंधित विभाग तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि पडताळणीनंतर तुमची माहिती पॅनकार्डावर अपडेट केली जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Download Aadhaar Card : भन्नाटच! आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येणार आधार आणि पॅन कार्ड; येथे आहे संपूर्ण प्रक्रिया

News ReelsSource link

Leave a Comment