Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4 Know Which Smartphone Is Best


Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4: Oppo ने आपला नवीन फोल्डेबल फोन Oppo Find N2 Flip ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षीच चीनमध्ये लॉन्च केला होता. गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये फोल्डेबल फोनची बाजारपेठ 9 ते 16 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. तर यावर्षी हा आकडा 23 मिलियनपर्यंत पोहोचू शकतो. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, फोल्डेबल फोन मार्केटमध्ये सॅमसंगचे वर्चस्व आहे आणि फोल्डेबल फोनमध्ये सॅमसंगचा सुमारे 62% हिस्सा आहे. यातच आपण Samsung चा नवीन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip4 5G आणि Oppo Find N2 Flip 5G ची तुलना करणार आहेत. ज्यात तुमच्यासाठी कोणता फोन असणार बेस्ट, हे जाणून घेणार आहोत.

Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4:  किंमत

Oppo Find N2 Flip 5G कंपनीने 849 पाउंडमध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे 85,000 रुपये आहे. Samsung Galaxy Z Flip4 5G ची किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होते.

Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4: कॅमेरा

तुम्हाला दोन्ही फोल्डेबल फोन्समध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल पण कॉन्फिगरेशन वेगळे आहेत. Oppo Find N2 Flip 5G मध्ये तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतो, तर Samsung Galaxy Z Flip4 5G मध्ये तुम्हाला दोन 12-मेगापिक्सेल कॅमेरे मिळतात. Oppo ने कॅमेरासाठी Hasselblad कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

जर आपण व्हिडीओ रेकॉर्डिंग क्षमतेबद्दल बोललो, तर Oppo Find N2 Flip 5G 4K रिझोल्यूशन व्हिडीओ 30 फ्रेम्स प्रति सेकंद आणि 1080 पिक्सेल रिझोल्यूशन व्हिडीओ 60 फ्रेम्स प्रति सेकंदात रेकॉर्ड करू शकतो. तर Samsung Galaxy Z Flip4 5G या बाबतीत अधिक चांगला आहे. 4K रिझोल्यूशन व्हिडीओ 60 फ्रेम्स प्रति सेकंद आणि 1080 पिक्सेल रिझोल्यूशन व्हिडीओ 240 फ्रेम्स प्रति सेकंदात रेकॉर्ड करतो. Oppo Find N2 Flip 5G मध्ये तुम्हाला इन-डिस्प्लेमध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल, तर Samsung Galaxy Z Flip4 5G मध्ये तुम्हाला 10-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4: परफॉर्मन्स

दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट प्रोसेसरसह येतात. Oppo च्या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 9000 Plus प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो, तर Samsung चा फोन Snapdragon 8th Plus Generation 1 चिपसेटवर काम करतो. तुम्हाला 128GB / 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये Samsung Galaxy Flip 4 मिळेल. तर Oppo फक्त एकाच प्रकारात येतो म्हणजे 256GB.

Oppo च्या फोल्डेबल फोनमध्ये 4200mAh बॅटरी आहे. जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Samsung चा फोन 3700mAh बॅटरीसह येतो, जो 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या फोनमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो, जो Oppo च्या फोनमध्ये नाही.

Oppo Find N2 Flip 5G मध्ये तुम्हाला Android 13 चा सपोर्ट मिळतो, तर Samsung चा फोन Android 12 वर लॉन्च झाला होता. ज्याला आता Android 13 अपडेट मिळाला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कंपनी तुम्हाला 4 वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट आणि 5 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेटसाठी सपोर्ट देते.

Oppo Find N2 Flip VS Samsung Galaxy Z Flip 4: डिस्प्ले 

ओप्पोच्या फोल्डेबल फोनचा बाह्य डिस्प्ले सॅमसंगच्या फोनपेक्षा खूप मोठा आहे. Oppo च्या फोनमध्ये तुम्हाला 3.26-इंचाचा डिस्प्ले मिळेल. तर Galaxy च्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 1.9-इंचाचा डिस्प्ले मिळेल. कारण Oppo च्या फोनमध्ये तुम्हाला बाहेर एक मोठा डिस्प्ले मिळतो. त्यामुळे तुम्ही मेसेज, नोटिफिकेशन्स, कॅमेरा फीचर्स इत्यादींचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता.

Oppo च्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.8-इंचाचा डिस्प्ले मिळतो. तर सॅमसंगच्या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळतो. दोन्ही स्मार्टफोन्स AMOLED फुल एचडी प्लस रिझोल्युशन डिस्प्लेसह येतात. जे 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.Source link

Leave a Comment