Oneplus Nord CE 3 Launching Soon, Know Price & Features


Oneplus Nord CE 3: चीनी मोबाईल फोन उत्पादक कंपनी OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 सादर करू शकते. इंटरनेटवर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केली नसली तरी एका रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी Nord CE2 चा अपडेटेड मॉडेल OnePlus Nord CE3 बाजारात आणणार आहे. हा स्मार्टफोन Xiaomi आणि Redmi च्या बजेट रेंज स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे. सध्या Nord CE 3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत लॉन्च करण्यापूर्वी इंटरनेटवर लीक झाली आहे, जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर या मोबाईलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…   

मोबाईल फोन स्पेसिफिकेशन 

Nord CE 3 मध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात दोन मेगापिक्सल्सचे आणखी दोन कॅमेरे असतील. म्हणजेच हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. OnePlus Nord CE3 मध्ये IPS LCD डिस्प्ले असेल जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करेल आणि 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. कंपनी Nord CE 3 मध्ये 256 GB स्टोरेज पर्याय देखील देऊ शकते.

कंपनीने OnePlus Nord CE 2 गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी  कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा होता, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला होता. OnePlus Nord CE 3 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. वनप्लस वेगवान चार्जिंगसाठी ओळखला जातो. म्हणूनच हे शक्य आहे की Nord CE3 मध्ये काही अपग्रेड केलेले चार्जिंग पर्याय उपलब्ध असतील. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा मोबाईल फोन 5000 mAh बॅटरीसह येईल, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

news reels New Reels

किंमत 

OnePlus Nord CE3 ची किंमत जवळपास 25,000 रुपये असू शकते. याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार हा स्मार्टफोन या किंमतीच्या रेंजमध्ये येऊ शकतो.

Oneplus 11 लवकरच होणार लॉन्च 

OnePlus पुढील महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी OnePlus 11 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. मजबूत बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला हा मोबाईल फोन बाजारात येणार आहे. OnePlus 11 5G ची किंमत स्टोरेजच्या आधारावर 50,000 ते 60,000 दरम्यान बदलू शकते.

हे स्मार्टफोनही लवकरच होणार लॉन्च 

OPPO A58 
iQOO Neo 7 
Moto S30 Pro 
vivo S16 
OPPO A1 Pro 
Samsung Galaxy A14 5G
vivo X90 Pro Plus 
OPPO Reno9

 Source link

Leave a Comment