OnePlus Nord 3 Features Leaked 50 Megapixel Camera, 6.5 Inch FHD Plus Display


Oneplus Nord 3:  जर तुम्ही Oneplus Nord 3 ची वाट पाहत असाल आणि त्याच्या फीचर्सबद्दल उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टिपस्टर देबायन रॉयने या मोबाईल फोनच्या फीचर्सबद्दल काही माहिती इंटरनेटवर शेअर केली आहे. टिपस्टरने ट्विटरवर पोस्ट केले की, Oneplus Nord 3 फोनमध्ये ग्राहकांना 6.5-इंचाचा FHD प्लस AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. जाणून घ्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आणखी काय काय मिळेल..

Oneplus Nord 3 मध्ये मिळू शकतात हे फीचर्स 

Oneplus Nord 3 मध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा FHD Plus डिस्प्ले मिळू शकतो. यासह तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. तर समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मिळू शकेल. स्मार्टफोन 4500 किंवा 5000 mAh बॅटरीसह येऊ शकतो जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन MediaTek Dimensity 8100 Max किंवा Dimensity 8200 Max चिपसेटवर काम करेल. Oneplus Nord 3 ची किंमत 27,000 ते 30,000 रुपयांच्याच्या दरम्यान असू शकते.

OnePlus ने ‘Nord 3’ संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. म्हणूनच तुम्हाला अधिक अचूक माहितीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. देबायन रॉय त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे तंत्रज्ञानाशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहतो आणि लीकनुसार डेटा प्रकाशित करतो. OnePlus ने अलीकडेच भारतात आपले 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. OnePlus 11 5G ची किंमत 56,999 ते 61,999 रुपयांपर्यंत आहे. तर OnePlus 11R ची किंमत 39,999 ते 44,999 रुपयांपर्यंत आहे. 14 आणि 28 फेब्रुवारीपासून तुम्ही दोन्ही स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

IQoo Neo 7 लवकरच होईल लॉन्च 

IQ 16 फेब्रुवारी रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन IQoo Neo 7 लॉन्च करू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 12/256GB मध्ये देऊ शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 120 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तुम्ही मोबाईल फोन ब्लू आणि इंटरस्टेलर ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकाल.

Source link

Leave a Comment