OnePlus Launches Buds Pro 2 Earbuds Price Specs And All Details


OnePlus Buds Pro 2 : OnePlus ने भारतात एका इव्हेंटमध्ये OnePlus 11, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad आणि OnePlus TV लॉन्च केले आहेत. यापैकी वनप्लस बड्स प्रो 2 सोबत बड्स प्रो 2 आर हे Buds देखील सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल केवळ भारतासाठी आहे. OnePlus Buds Pro 2 आणि Buds Pro 2R शी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे.

OnePlus Buds Pro 2 : OnePlus Buds Pro 2 किंमत आणि प्री-ऑर्डर

OnePlus Buds Pro 2 ची किंमत रु. 11,999 पासून सुरू होते. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असतील, तर या बड्सची प्री-ऑर्डर करू शकता. 14 फेब्रुवारीपासून बड्सची विक्री सुरू होईल.

OnePlus Buds Pro 2 : Buds Pro 2R भारतात सादर करण्यात आला आहे

OnePlus ने भारतात (India) आपल्या बड्सचे खास मॉडेल सादर केले आहे. OnePlus ने आपल्या देशात Buds Pro 2R व्हर्जन देखील सादर केला आहे. भारतात या विशिष्ट मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. हे विशेष व्हर्जन मार्चमध्ये उपलब्ध करून दिले जाणार जाणार आहे.

OnePlus Buds Pro 2 : OnePlus Buds Pro 2 चे फीचर्स 

  • OnePlus Buds Pro 2 11mm डायनॅमिक ड्रायव्हर आणि 6mm प्लॅनर डायफ्राम ड्रायव्हरसह देऊ शकतो.
  • बड्स Active Noise Cancellation साठी ड्युअल मायक्रोफोन, कॉल नॉइज कॅन्सल करण्यासाठी ट्रिपल-मायक्रोफोन आणि बायनॉरल लो-लेटेंसी ब्लूटूथ ट्रान्समिशन आहे.
  • OnePlus Buds Pro 2 ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह येण्याची अपेक्षा आहे.
  • हे इयरबड्स Android आणि iOS दोन्ही उपकरणांना सपोर्ट करतील.
  • Buds मध्ये तुम्हाला water resistant साठी IP55 रेटिंग आणि केससाठी IPX4 सपोर्ट मिळू शकते.
  • इअरबड्स 60mAh बॅटरीसह येऊ शकतात, जे तुम्हाला 9 तासांपर्यंत स्टँडअलोन सोंगचा आनंद देऊ शकतात.
  • कॅरी केसमध्ये 520mAh बॅटरी आढळू शकते, जी 39 तासांच्या प्लेबॅकला सपोर्ट करेल.

नॉइज बड्स कॉम्बॅट TWS भारतात लॉन्च 

नॉइजने भारतात (India) आपले नवीन इअरबड्स नॉईज बड्स कॉम्बॅट लॉन्च केले आहेत. नॉईज बड्स कॉम्बॅट भारतीय बाजारपेठेत 1,499 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये क्वाड माइक ईएनसी सपोर्ट करण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून याची विक्री केली जात आहे.

हेही वाचा: 

OnePlus Cloud 11 Launch Event: आज Oneplus चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमतSource link

Leave a Comment