OnePlus Big Event In Delhi Many Gadgets Will Be Launched You Can Watch This Event From Home


OnePlus Event 2023 : आज OnePlus चा क्लाउड 11 इव्हेंट होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीची जी उत्पादने लॉन्च होणार आहे, त्यांची यादी कंपनीने आधीच जाहीर केली आहे. या यादीत OnePlus 11 5G, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus Pad आणि OnePlus Smart TV चा समावेश आहे. यातील अनेक उत्पादनांचे स्पेसिफिकेशन्सही समोर आले आहेत. कंपनीने अद्याप यापैकी कोणत्याही उत्पादनाची किंमत जाहीर केलेली नाही. OnePlus 11 5G हे या कार्यक्रमात सादर होणारे मुख्य उत्पादन आहे. यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला असला तरी, अद्याप भारतात हा लॉन्च करण्यात आलेला नाही. हा इव्हेंट तुम्ही कधी कसा आणि कुठे पाहू शकता, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

OnePlus Event 2023 : वनप्लसचा क्लाउड 11 इव्हेंट कसा पाहायचा?

जर तुम्ही काही कारणास्तव या इव्हेंट जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर घरी बसून कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासाठी तुम्हाला वनप्लसच्या यूट्यूब चॅनलवर जावे लागेल. कंपनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगची वेळ 7 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 19:30 वाजताची आहे, म्हणजेच रात्री 7:30 वाजता. याशिवाय तुम्ही नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी OnePlus 11 लॉन्च इव्हेंट पेजवर नोंदणी करू शकता.

वनप्लस Vs सॅमसंग

वनप्लसने (OnePlus) अलीकडे सॅमसंग S23 सीरीज लॉन्च झाल्यानंतर एकामागून एक अनेक ट्वीट केले आहेत, ज्यामध्ये कंपनीने सॅमसंगची खिल्ली उडवली आहे. कंपनीने सांगितले होते की, बॉक्समध्ये चार्जर नाही, तरीही मोबाईलची किंमत इतकी जास्त आहे आणि कॅमेरा देखील विशेष नाही. युजर्सनीही ट्विटवर उग्र प्रतिक्रिया दिल्या. Samsung S23 सीरीजची सुरुवातीची किंमत सुमारे 70 हजार आहे, तर टिपस्टर अभिषेक यादव यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, OnePlus 11 5G ची किंमत सुमारे 60,000 रुपये असू शकते. असं असलं तरी कंपनीने किंमतीबद्दल कोणतेही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

Poco X5 सीरीज लॉन्च 

चीनी स्मार्टफोन कंपनी Poco ने आज आपले  2 नवीन स्मार्टफोन Poco X5 5G आणि Poco X5 Pro 5G जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी, 108 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 778G चा सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: 

सॅमसंगचा हा स्मार्टफोन पुन्हा झाला स्वस्त झाला, जाणून घ्या किती आहे किंमतSource link

Leave a Comment