Oneplus 115g Will Be Available For Pre Booking In Amazon Teaser Know Specification And Details Here Marathi News


Oneplus 11 5G Pre-Booking : चीनी मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस OnePlus 7 फेब्रुवारी रोजी भारतात आपले 2 नवीन स्मार्टफोन, एक स्मार्ट टीव्ही, इयरबड्स आणि OnePlus पॅड लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा इव्हेंट नवी दिल्ली येथे होणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच हा इव्हेंट ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील हा इव्हेंट पाहू शकता. कंपनी या इव्हेंटमध्ये OnePlus 11 5G आणि OnePlus 11R लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) ने आपल्या प्लॅटफॉर्मवर OnePlus 11 5G या स्मार्टफोनचा टीझर पोस्ट केला आहे, यावरून असे दिसून येते की, हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर तुम्ही प्री-बुकिंग करू शकाल. Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC आणि Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा OnePlus 11 5G मध्ये दिसतील. 

OnePlus 11 5G स्पेसिफिकेशन (Oneplus 11 5G Specification) :

OnePlus 115G मध्ये, तुम्हाला 6.7-इंचाचा QHD + E4 OLED डिस्प्ले मिळेल जो 120hz रिफ्रेशला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Generation 2 SoC वर काम करेल. यामध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कॅमेराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्हाला मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल IMX890 कॅमेरा, 48 मेगापिक्सेल सोनी IMX581 सेन्सर आणि 32 मेगापिक्सेल IMX709 2x टेलिफोटो कॅमेरा असेल. समोर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. 

किंमत किती असेल? (Oneplus 11 5G Price) :

टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, OnePlus 11 5G भारतात सुमारे 60,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र, कंपनीकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Coca-Cola 10 फेब्रुवारीला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार 

लवकरच Coco-col  ब्रँड आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यासाठी Coco-cola कंपनीने Real Me बरोबर भागिदारी केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी, Realme Coca-Cola चा नवीन स्मार्टफोन Realme 10 Pro 5G भारतात लॉन्च करेल. हा एक नवीन एडिशन स्मार्टफोन असेल ज्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये बदल पाहायला मिळतील. सध्या, कंपनीने कोका-कोला स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरू केले आहे. Realme अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचा स्मार्टफोन मोफत बुक करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Chinese Internet of Things : चीनचं नवं शस्त्र जगासाठी धोक्याची घंटा; इंटरनेट नेटवर्कचा हेरगिरीसाठी वापर, समोर आली ‘ही’ धक्कादायक माहितीSource link

Leave a Comment