Oneplus 11 Full Charge In Just 15 Minutes Oneplus 11 Will Get 512GB Storage Will Be Launched In Five Days


Upcoming Oneplus Mobile 2023:  OnePlus च्या नवीन फोनची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी अवघ्या 5 दिवसांनी OnePlus 11 अधिकृतपणे लॉन्च करणार आहे. मात्र हा लॉन्च इव्हेंट चीनमध्ये होणार असून हा मोबाईल फोन भारतात 7 फेब्रुवारीला येणार आहे. जर तुम्ही देखील नवीन वर्षात प्रीमियम मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या तुमच्यासाठी OnePlus 11 का चांगला आहे की नाही.

OnePlus 11 मध्ये 6.7 QHD Plus AMOLED डिस्प्ले दिसेल, जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाईल फोन 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल. ज्यामध्ये पहिला 12/256GB आणि दुसरा 16/512GB आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचं झाल्यास यात Qualcomm Snapdragon 8 Generation 2 प्रोसेसर OnePlus 11 मध्ये उपलब्ध असेल. या मोबाईल फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसेल. ज्यामध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर, 48MP IMX581 सेन्सर आणि 32MP IMX709 सेन्सर असेल. OnePlus 11 मध्ये 5000 mah ची पॉवरफुल बॅटरी आणि 100 वॅट्सची फास्ट चार्जिंग असेल. ज्याने हा फोन फक्त 15 मिनिटात फुल चार्ज होऊ शकतो.

Oneplus 11 Launch Date in India: डिझाइन

Oneplus 10 Pro सारखे डिझाइन OnePlus 11 मध्ये उपलब्ध होणार नाही. OnePlus 10 Pro मध्ये जिथे तुम्हाला चौकोनी आकाराचा कॅमेरा दिसत होता, OnePlus 11 मध्ये कॅमेरा गोल आणि एम्बॉस्ड असेल. म्हणजेच हा फोन खाली ठेवल्यावर थोडा जमिनीपासून उंचावलेला दिसू शकतो. मोबाईल फोन मेटल फ्रेम आणि वक्र डिस्प्लेसह येईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाईल फोन दोन रंगांमध्ये लॉन्च केला जाईल. ज्यामध्ये पहिला ग्रीन आणि दुसरा ब्लॅक रंग मिळणार आहे.

Oneplus 11 Price in India: किंमत 

कंपनीने OnePlus 10 Pro लॉन्च केला असून याची प्रारंभिक किंमत 66,999 रुपये आहे. कारण हा मोबाईल फोन 10 प्रो पेक्षा चांगले फीचर्स आणि डिझाइन ऑफर करतो. असे बोलले जात आहे  की OnePlus 11 ची किंमत सुमारे 70,000 रुपये असू शकते. मात्र लाँचिंगच्या तारखेनंतरच नेमकी माहिती समोर येईल.

live reels News Reels

दरम्यान, OnePlus व्यतिरिक्त Redmi 12 सीरीज नवीन वर्षात लॉन्च होणार आहे. Redmi 12 सीरीज भारतात 4 जानेवारी रोजी लॉन्च होईल आणि 11 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. याशिवाय Samsung Galaxy s23 सीरीज, Realme GT Neo 5, Moto x40 सारखे अनेक मोबाईल नवीन वर्षात लॉन्च होणार आहे.

 

 Source link

Leave a Comment