OnePlus 11 5G Vs Iphone 14 Which Smartphone Is The Best Find Out


Onpelus 11 5G vs Iphone 14: चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus ने 7 फेब्रुवारी रोजी OnePlus 11 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने कॅमेरा मॉड्यूल बदलला आहे. ज्यामुळे तुम्हाला स्मार्टफोनचा वेगळा लूक मिळेल. आज आम्ही तुम्हाला OnePlus 11 5G आणि Iphone 14 या स्मार्टफोनची तुलना करून तुमच्यासाठी कोणता कोणता फोन आहे फायदेही हे सांगणार आहोत. यात आपण या दोन्ही फोनची बॅटरी, डिस्प्ले, स्टोरेज, परफॉर्मन्स आणि किंमतबद्दल जाणून घेणार आहोत.

 Onpelus 11 5G vs Iphone 14: डिस्प्ले आणि बॅटरी

तुम्हाला Apple च्या iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळेल, तर OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला iPhone 14 मध्ये 3279 mAh ची बॅटरी पाहायला मिळेल.  तर OnePlus 11 5G मध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. OnePlus फोन बॅटरी आणि डिस्प्ले या दोन्ही बाबतीत पुढे आहे.

 Onpelus 11 5G vs Iphone 14: परफॉर्मन्स 

परफॉर्मन्सच्या बाबतीत तुम्हाला iPhone 14 मध्ये a15 बायोनिक चिपसेट मिळेल. तर OnePlus 11 5G मध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 8व्या जनरेशनचा चिपसेट दिला आहे. OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण देण्यात आले आहे. CPU बद्दल बोलायचे झाले तर iphone 14 मध्ये कंपनी ने Hexa Core चा सपोर्ट दिला आहे, तर OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला Octacore CPU चा सपोर्ट मिळतो.

 Onpelus 11 5G vs Iphone 14: कॅमेरा 

कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 11 5G मध्ये तुम्हाला मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. यातच iPhone 14 मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 12 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आहेत. म्हणजेच OnePlus 11 5G कॅमेर्‍याच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. कारण त्यात तुम्हाला चांगले रिझोल्यूशन मिळेल. समोरील बाजूस iPhone 14 मध्ये 12-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे, तर OnePlus 11 5G मध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

 Onpelus 11 5G vs Iphone 14: किंमत 

किंमतीच्या बाबतीत देखील OnePlus 11 5G ची किंमत 56,999 रुपये आहे, तर iPhone 14 ची किंमत 65,999 रुपयांपासून सुरू होते. म्हणजे दोघांमध्ये 9 ते 10 हजारांचा फरक आहे.

 Onpelus 11 5G vs Iphone 14: तुमच्यासाठी कोणता आहे फोन बेस्ट? 

आयफोन 14 Apple ने गेल्या वर्षी लॉन्च केला होता. तर OnePlus 11 5G नुकताच लॉन्च केला गेला आहे. यामध्ये OnePlus 11 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे, कारण यामध्ये तुम्हाला कमी किमतीत चांगला कॅमेरा, मजबूत बॅटरी, चांगला स्टोरेज आणि रॅम सपोर्ट मिळतो. iPhone 14 OnePlus 11 5G पेक्षा महाग असूनही तो अजूनही अनेक बाबतीत मागे आहे. Source link

Leave a Comment