Now Caller Name From Unknown Number Will Be Displayed Trial Proposal


Telecom : देशभरातील किंवा जगभरातील यूजर्ससाठी अनोळखी नंबर वरून फोन येणं ही एक मोठी तशीच गंभीर समस्या आहे. तर, काहींना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. याच गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित करून आता TRAI कडून एक नवीन सुविधा अमलात आणली जाणार आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांची अनोळखी नंबरपासून (Unknown Number) सुटका होणार आहे. कारण, नव्या सुविधेनुसार, आता जी व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्या व्यक्तीचं नाव तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेलं नसलं तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.

या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या नवीन उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.    

वापरकर्त्यांना मिळणार खरी माहिती 

Reels

गेल्या काही दिवसांत Unknown नंबरवरून येणाऱ्या कॉलमुळे अनेक वापरकर्त्यांची फसवणूक झाली आहे. याची काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. त्यामुळे याच प्रकारावर आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येतं. त्यासाठी आपण Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा वापर देखील करतो. मात्र, Truecaller सारखी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.

शिवाय आजकाल ही अ‍ॅप्स तुमच्याकडून ते देत असलेल्या सेवेचे मूल्य देखील आकारतात. तर, या अ‍ॅप्सद्वारे मिळणारी माहिती देखील पूर्णपणे खरी असेल असा दावा करता येत नाही. त्यामुळे आपली काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असतेच. मात्र, सध्या ट्रायद्वारे केवायसी आधारित जी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे ग्राहकांना 100 टक्के अचूक माहिती मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

10 हजार कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या निर्णयानंतर Amazon चे मालकाची मोठी घोषणा, जेफ बेजोस संपत्ती करणार दानSource link

Leave a Comment