Nothing Phone 1 Can Be Bought For Under Rs 14,999 On Flipkart Find Out What’s On Offer


Nothing Phone 1: जर तुम्ही नवीन वर्षात तुमच्यासाठी बजेट 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्ही बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत प्रीमियम फोन खरेदी करू शकता. होय, हे वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. यात तुम्हाला चांगली बॅटरी, उत्तम कॅमेरा, आणि जबरदस्त रॅम मिळेल. आम्ही ज्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत तो आहे नथिंग फोन 1 (Nothing Phone 1).

बाजारात नथिंग फोन वनची (Nothing Phone 1) किंमत 38,000 रुपये आहे, परंतु ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर, 31% डिस्काउंटनंतर तो 25,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध झाला आहे. ही किंमत याच्या 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजची आहे. याशिवाय इतर अनेक ऑफर्सचा लाभही या स्मार्टफोनवर दिला जात आहे.

Nothing Phone 1: मिळत आहे खास ऑफर 

जर तुम्ही ICICI बँक कार्डने Nothing Phone 1 फोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला यावर 1,000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचा फायदाही दिला जात आहे, ज्याअंतर्गत तुम्ही 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा लाभ मिळत असेल, तर तुम्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळेल. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला नाही, तर त्यानुसार फोनची किंमत वाढेल. या स्मार्टफोनवर तुम्हाला फक्त 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. अशामध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 14,999 मध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही बजेट रेंजमध्ये एक उत्तम स्मार्टफोन घरी आणू शकता.

Nothing Phone 1: नथिंग फोन वन स्पेसिफिकेशन

नथिंग फोन 1 मध्ये ग्राहकांना 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो, जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये 4500 mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 778+ SoC द्वारे समर्थित आहे. 8/128GB, 8256GB आणि 12/256 GB स्टोरेज पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला नथिंग फोन 1 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिसेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX766 सेन्सर आणि दुसरा 50-मेगापिक्सेल Samsung JN1 सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. नथिंग फोन वनमध्ये कंपनी 3 वर्षांसाठी अँड्रॉइड सपोर्ट आणि 4 वर्षांसाठी दर 2 महिन्यांनी सेफ्टी अपडेट देईल.

news reels

 

 Source link

Leave a Comment