Nomophobia Fear Of Being Without Your Mobile Phone And Digital Device Marathi News


Nomophobia : तुम्ही सतत मोबाईलचा वापर करताय? आज प्रत्येकजण मोबाईल वापरताना दिसतो.. घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, प्रवास करताना… जिथे तिथे प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसत आहे. पण मोबाईलच्या अति वापरामुळे तुम्हाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागेल. मोबाईलचा अति वापर केल्यास नामोफोबिया होऊ शकते, असं समोर आलेय. पण हे नामोफोबिया नेमकं काय आहे.. यापासून कसा बचाव कराल.. याबाबत जाणून घेऊयात…

नोमोफोबिया (Nomophobia) या शब्दाचा अर्थ शब्दात मोडल्यास “नो-मोबाईल-फोबिया” असा होतो. नोमोफोबिया ही एक नवीन संकल्पना आहे. जे लोक मोबाईलशिवाय जगू शकत नाही त्यांच्याविषयी भीती आणि काळजी या नोमोफोबियामधून दाखविली जाते. नोमोफोबिया ही एक मानसिक स्थिती आहे. जेव्हा नोमोफोबिया असलेले लोक त्यांच्या स्मार्टफोन किंवा डिजिटल गॅजेट्सपासून दूर असतात तेव्हा त्यांना भीती वाटते. जर एखाद्याला नोमोफोबिया असेल, तर त्यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणं जाणवतात. जसे की, घाम येणे, थरथरणे आणि डिजिटल गॅजेट्स किंवा स्मार्टफोनपासून दूर असताना हृदयाचे ठोके वाढतात.

अलिकडच्या काळात नोमोफोबियाचं प्रमाण वाढलं –

स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, आयपॅड यांसारखे गॅजेट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. त्यामुळेच अलिकडच्या काळात नोमोफोबियाचं प्रमाण वाढलं आहे. काही लोक संवादासाठी, काही मनोरंजनासाठी तर काही कामासाठी स्मार्टफोनचा किंवा डिजिटल गॅजेट्स वापर करतात. त्यामुळे त्यांना डिजिटल गॅजेट्सची इतकी सवय झाली आहे की, थोडेसे जरी अंतर ठेवले तरी भीती आणि चिंता वाटू लागते.   

नोमोफोबिया हा मानसिक आजार आहे का?

नोमोफोबिया अद्याप अधिकृतपणे मानसिक आजार (Mental Health Disorder) मानण्यात आलं नाही. पण, जर का तुम्ही याच्या सापळ्यात सापडलात की त्याचे तुमच्या आयुष्यावर फार घातक परिणाम होऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या  नातेसंबंधावर आणि सामाजिक वागणुकीवर होऊ शकतो. यामुळे निर्माण होणाऱ्या चिंता किंवा नैराश्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

नोमोफोबियासाठी उपाय काय ?

तुम्हाला जर नोमोफोबिया झालाच तर चिंता करण्याचं कारण नाही. याचं कारण म्हणजे नोमोफोबिया टाळण्याचा एक मार्ग आहे. तुमच्‍या स्‍मार्टफोन किंवा डिजिटल डिव्‍हाईसपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमची स्मार्टफोनवरील डिपेंडन्सी कमी करा. स्मार्टपोन वापरण्याची एक वेळ निश्चित करा आणि तुमचे डिव्हाईस फक्त त्या मर्यादित वेळेत वापरा. या दरम्यान व्यायाम करा, तुमचे छंद जोपासा, मित्र-मंडळी नातेवाईकांना भेटा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नोमोफोबियाशी संबंधित गंभीर चिंता किंवा त्रास होत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ञांना भेटा. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Twitter CEO : एलॉन मस्क यांचा कुत्रा ट्विटरचा नवा CEO; दिमाखात खुर्चीवर बसलेला फोटो ट्वीट, केली ‘ही’ नवी घोषणाSource link

Leave a Comment