Nokia And Ericsson Have Inked Multi-year Supply Contracts With Reliance Jio For Supplying 5G Network Equipment


Reliance Jio: येत्या काही दिवसांत देशात 5 जी इंटरनेट सुरू होणार आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) हायस्पीड इंटरनेटसाठी नोकिया (Nokia) आणि एरिकसन (Ericsson) कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार, जिओ आता या दोन कंपन्यांसह हायस्पीड नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे. नोकिया आणि एरिकसनच्या नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून जिओ आपल्या ग्राहकांना अल्ट्रा हाय इंटरनेट स्पीड देऊ करणार आहे. त्याशिवाय लॅग-फ्री कनेक्टिव्हीटीदेखील मिळणार आहे. 

युजर्सचा फायदा कसा?

स्वीडिश टेलिकॉम गिअर मेकर एरिकसनने (Ericsson)  रिलायन्स जिओसोबत स्ट्रॅटेजिक 5जी कॉन्ट्रॅक्ट कराराची घोषणा केली आहे. एरिकसन जिओसाठी स्टॅण्डअलोन 5 जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे. देशात फक्त रिलायन्स जिओ  स्टॅण्डअलोन 5 जी नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे. तर, नोकियाकडून जिओला 5जी रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅक्सेस नेटवर्कची मदत केली जाणार आहे.

एअरटेलला धक्का का?

नोकिया आणि एरिकसनसोबत करार केल्याने एअरटेलला मोठा धक्का बसला आहे. नोकिया आणि एरिकसन भारतात जिओला स्टॅण्डअलोन नेटवर्क स्थापन करण्यास मदत करणार आहे. त्याशिवाय, हायस्पीड 5 जी नेटवर्क देणार आहे. एअरटेल नॉन स्टॅण्डअलोन नेटवर्कवर काम करते. त्याशिवाय, जिओजवळ अधिक भागांमध्ये नेटवर्क देणारे 700MHz नेटवर्क आहे. त्यामुळे जिओ देणार असलेले 5 जी इंटरनेट अधिक वेगवान असणार आहे. 

हायस्पीड 5 जी इंटरनेट मिळणार

एका अंदाजानुसार, भारतात 5 जी डेटा स्पीड हा 4 जीच्या तुलनेत दहापट अधिक असणार आहे. हायस्पीड 5 जी नेटवर्कच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, सेल्फ ड्रायव्हिंग आदीसारख्या तंत्रज्ञानात मदत होणार आहे. 

रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्र लिलावात सर्वाधिक बोली लावली होती. जिओकडे अधिक सर्कलमध्ये 5 जी इंटरनेट सेवा पुरवण्याचा परवाना आहे. रिलायन्स जिओ लवकरच गुगलसह 5 जी फोन लाँच करणार आहे. जिओच्यावतीने सध्या चार शहरांमध्ये 5 जी नेटवर्क रोलआउट करण्यात आहे.  

रिलायन्स जिओ देणार स्वस्तातील 5 जी मोबाईल 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 5 जी बाबत मोठ्या घोषणा केलेल्या. देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट जिओ देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याशिवाय, रिलायन्स जिओकडून स्वस्तातील 5 जी मोबाईल फोन देण्यात येणार आहे. 

 Source link

Leave a Comment