Window 11 Update: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) विंडोज 11 साठी नवीन अपडेट जारी केले आहे. अपडेटमध्ये लोकांना टास्कबारमध्ये AI आधारित ‘बिंग सर्च इंजिन’ मिळेल. म्हणजेच तुम्ही टास्कबारमधूनच ते वापरण्यास सक्षम असाल. याशिवाय आता आयफोन यूजर्स फोनला लॅपटॉपशी कनेक्ट करू शकणार आहेत. नवीन फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला विंडोज अपडेट (Window 11 Update) करावे लागेल. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन विंडो अपडेट (Window 11 Update) पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला अपडेट दिसेल जे तुम्हाला डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल.
Window 11 Update: टास्कबारमध्ये चॅटबॉटची सुविधा उपलब्ध असेल
अलीकडेच मायक्रोसॉफ्टने (Microsoft) Bing आणि Edge ब्राउझरमध्ये AI आधारित चॅटबॉटचा समावेश केला आहे. आता कंपनी युजरला डायरेक्ट टास्कबारमध्ये ही सुविधा देणार असून येथून तुम्ही थेट चॅटबॉटवरून प्रश्न विचारू शकता.
Window 11 Update: विंडोजशी आयफोन कनेक्ट करता येईल
आतापर्यंत फक्त Android युजसार फोनला विंडोशी (Window 11 Update) कनेक्ट करू शकत होते, परंतु नवीन अपडेटनंतर, आयफोन युजसार देखील त्यांचा फोन विंडोशी सहजपणे कनेक्ट करू शकतील. हे फीचर वापरण्यासाठी तुमच्या लॅपटॉपमध्ये (Laptop) फोन लिंक अॅप असणे आवश्यक आहे. याशिवाय नवीन अपडेटमध्ये युजर्स स्निपिंग टूल अॅप्लिकेशनद्वारे स्क्रीन रेकॉर्डिंग देखील करू शकतील. यासाठी तुम्हाला अॅप (App) ओपन करून रेकॉर्ड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. नवीन अपडेटमध्ये तुम्ही नोटपॅडमध्ये (notepad) टॅब तयार करण्यास सक्षम असाल. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी अनेक टॅबमध्ये काम करू शकता.
The February 2023 non-security preview release is now available for Windows 11, version 22H2 #Windows11 #ContinuousInnovation pic.twitter.com/AbEzXrdEFM
— Windows Update (@WindowsUpdate) February 28, 2023
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट (microsoft) एकामागून एक सर्व प्लॅटफॉर्म आपापल्या उत्पादनांवर AI टूल्स आणत आहेत. गेल्या वर्षी ओपन एआयने चॅट जीपीटी लाईव्ह केले होते. तेव्हापासून एआय टूल्सची लोकप्रियता वाढली आहे. मायक्रोसॉफ्ट (microsoft), गुगल (Google), ऑपेरा नंतर आता युजर्सना स्नॅपचॅटमध्येही ‘MY AI’ नावाच्या चॅटबॉटची सुविधा मिळणार आहे. युजर्स ‘चॅट’ (Chat) सेगमेंट लोकप्रिय या चॅटबॉटमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. चॅटबॉटची (ai chatbot) लोकप्रियता जास्त आहे, कारण ती माणसांप्रमाणेच प्रश्नांची उत्तरे देते.
इतर महत्वाच्या बातमी: