Netflix Ad Supported Plan To Start In November Know Its Benifits And Price Marathi News


Netflix Ads Plan : Netflix ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन जाहिरात आधारित प्लॅन सादर केला आहे. हा नवीन प्लॅन पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेटफ्लिक्सचा हा नवीन ‘बेसिक विथ अॅड्स’ प्लान सध्या 12 देशांमध्ये लागू होणार आहे. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे. मात्र, सध्या तरी या देशांच्या यादीत भारताचा समावेश नाही. हा नवा बेसिक प्लॅन काय आहे ते जाणून घ्या. 

Netflix च्या ‘Basic With Ads’ प्लॅनची किंमत किती?

Netflix च्या नवीन ‘बेसिक विथ अॅड्स’ प्लॅनची किंमत यूएस मध्ये $6.99 आहे, जी भारतीय चलनात सुमारे 575 रुपये आहे. असे असेल तरी Netflix ने भारतात अजून कोणतीही स्किम सुरु केली नाही. सध्या नेटफ्लिक्सचा स्टँडर्ड प्लॅन भारतात बेसिकपेक्षा चांगला 500 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.

Netflix चा नवीन जाहिरात प्लॅन कधी आणि कुठे सुरु होणार आहे हे पाहा. 

  • कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये 1 नोव्हेंबरपासून हा प्लॅन सुरु होईल.
  • 3 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुरु होईल.
  • 10 नोव्हेंबरपासून स्पेनमध्ये हा प्लॅन सुरु होणार आहे. 

नेटफ्लिक्सच्या नवीन प्लॅन संदर्भात माहिती 

Netflix च्या मते, या नवीन प्लॅनचे फायदे त्याच्या सध्याच्या बेसिक प्लॅन प्रमाणेच असतील पण यामध्ये किंमतीत थोडेफार बदल होतील. Netflix च्या बेसिक प्लॅनची ​​यूएसमध्ये किंमत $9.99 आहे आणि जाहिरातीसह नवीन बेसिकची किंमत $6.99 आहे. नवीन प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये कॉंटेंट, Personalised User Experience आणि Connected Devices यांची संख्या मूलभूत प्लॅन सारखीच आहे.

दोन्ही प्लॅनवर, यूजर्स फक्त 1 कनेक्ट केलेले डिव्हाईस वापरण्यास सक्षम असतील. यातील फरक असा असेल की यूजर्स कंपनीच्या नवीन जाहिरात-आधारित बेसिक प्लॅनमध्ये सिनेमा किंवा टीव्ही शो डाऊनलोड करू शकणार नाहीत. तसेच काही सिनेमे आणि शो बेसिक विथ अ‍ॅड्स प्लॅनवर सपोर्ट करणार नाहीत. Netflix च्या $6.99 प्लॅनसह, व्हिडीओ 720 पिक्सेल म्हणजेच HD मध्ये उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना एका तासाच्या व्हिडीओ शोमध्ये 4-5 जाहिराती पाहायला मिळतील. जाहिरातींचा कालावधी 15-30 सेकंदांचा असेल, मात्र पहिला शो किंवा पहिला सिनेमा जाहिरात फ्री असेल.

महत्वाच्या बातम्या : 

WhatsApp Feature : भन्नाटच! आता व्हॉट्सअॅपचे मेसेजही Edit करता येणार; लवकरच येणार नवं फिचरSource link

Leave a Comment